माजी आमदार दिलीपकुमार सानंदा 12 जून रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
"25 हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली सानंदांचा मोठा प्रवेश"
बुलढाणा /( छोटू कांबळे ) - बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्ष सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सानंदा यांचा पक्षप्रवेश 12 जून रोजी होणार असून, या प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. सानंदा यांच्या म्हणण्यानुसार, 25 हजार कार्यकर्ते या सोहळ्यात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा निर्णय पक्षीय बदलाचा मोठा धक्का मानला जात आहे, कारण सानंदा यांचा बुलढाणा जिल्ह्यात राजकीय व सामाजिक प्रभाव लक्षणीय आहे.
राजकीय सोईनुसार बदल सुरूच
गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते आपल्या राजकीय हितसंबंधानुसार पक्षांतर करत आहेत. यामध्ये काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे धक्के बसले आहेत. सानंदा यांच्या या निर्णयामुळेबुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आता त्यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल, तर काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर जबर फटका बसण्याची चिन्हे आहेत.
0 Comments