द बातमीवाला

 

  

www.thebatmiwala.com डिजिटल न्यूज वेबसाईट वाचकांच्या सेवेत सादर करताना आनंद होत आहे. प्रत्येक घटना, घडामोडी, वस्तुनिष्ठ, निःपक्ष, निर्भीड बातम्या, विशेष घटनांचे कव्हरेज तसेच समाजकारण, राजकारण, गुन्हेगारी, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, अर्थ, व्यापार व ट्रेडिंग असा वाचनीय मजकूर देण्याचा प्रयत्न आम्ही 'द बातमीवाला'च्या माध्यमातून करणार आहोत.


 


 मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे बदल हा स्वीकारलाच पाहिजे. असे समजूनच एक पाऊल पुढे चालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आजच्या काळात मोबाईल हा प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकांच्या हातात आहे. त्यामुळे बातमी व्हायरल / स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही.

 

जगातील कोणतीही घटना वाचकांपर्यंत एका 'क्लिकवर' सहज पोहोचते. त्यामुळे मोबाईल हे प्रभावी माहितीस्त्रोताचे 'अस्त्र' ठरत आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे अख्ख्ये जग आता 'मुठीत' असल्यासारखे वाटते.

 


विश्वासार्हता हीच आमची मोठी ताकद राहिल. वाचकांच्या सूचनांचे नेहमीच स्वागत ..!!

Post a Comment

0 Comments