चिखलीत शिवसेनेचा महास्फोट ; शेकडो कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक पक्षप्रवेश
आमदार संजुभाऊ गायकवाड यांचा मास्टरस्ट्रोक; भाजपसह इतर पक्षांना मोठा धक्का
// बुलढाणा | छोटु कांबळे //
बुलढाणा /(द बातमीवाला )- चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला जबरदस्त कलाटणी देणारी ऐतिहासिक घडामोड आज बुलढाण्यात पाहायला मिळाली. शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप, उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी तसेच विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी, सरपंच, शाखाप्रमुख, बूथप्रमुख,उपशाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या भव्य प्रवेशामुळे चिखली मतदारसंघातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले असून शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
गावावागावातून शिवसेनेकडे मोठी लाट
उदयनगर, भोगावती, अटकळ, शिंदेहराळी, पांगरखेड, सोयगाव, शेलुद, ढालसावंगी, दहिद खुर्द, केळवद, देवपूर, करणखेड, भानखेड, तेल्हारा, पेठ, बोरगाव काकडे, आंधई, गोदरी, डोंगरशेवली आदी गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकाच मंचावरून शिवसेनेत प्रवेश करत शक्तिप्रदर्शन केले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बूथ प्रमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
⚡ संजुभाऊ गायकवाड यांचे नेतृत्व ठरले निर्णायक
या भव्य पक्षप्रवेशामागे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी कोणताही दबाव नसताना स्वेच्छेने शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. “शिवसेना ही सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. आजचा पक्षप्रवेश हा जनतेच्या वाढत्या विश्वासाचा पुरावा आहे,” असे संजुभाऊ गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरोधकांना मोठा धक्का; समीकरणे बदलणार
भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. गावपातळीपासून मतदारसंघापर्यंत नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आगामी निवडणुकांवर होणार परिणाम
या ऐतिहासिक पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः तरुणांचा वाढता ओढा हा निर्णायक घटक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
मोठ्या संख्येने उपस्थिती : या सोहळ्यास शिवसेना जिल्हा व तालुका पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी दणाणून गेला.
यांनी केला शिवसेना पक्ष प्रवेश
🔹 उदयनगर (उंद्री) येथून प्रवेश करणारे: सरपंच मनोज लाहुडकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत, नदीम अंसारी, अमोल लाहुडकर, सुरेश बनसोड, संकल्प अर्बनचे अध्यक्ष अक्षय कारंडे, युवक काँग्रेस जिल्हा सचिव रोहन कारंडे.🔹 भोगावती, अटकळ व परिसर: उपसरपंच मदन पाटील, दीपक शेळके, संदीप काळे, किरण शिंदे, शिवा शेरे, आनंद जाधव, साहिल शिंदे, विशाल जाधव, करण राजपूत, सागर दांडगे, महेंद्र राजपूत, गोपाल निकाळजे, गजानन रोजेकर, विशाल शेळके, सुरेश राजपूत, गणेश शेळके.
🔹 शिंदेहराळी येथून: मुन्ना सुरडकर, हरी सपकाळ, शंकर सुरडकर, सिद्धू सुरडकर, दत्ता सपकाळ, गणेश सुरडकर, राजू पवार, साई सुरडकर, गोपाल सुरडकर, धनंजय सुरडकर, अक्षय सुरडकर, ओम सपकाळ, वैभव पवार.
🔹 पांगरखेड: भाजपा व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख तथा सरपंच राजाराम पिंपळे, अरुण पिंपळे, भानुदास पिंपळे, पुंजाजी पिंपळे, ज्ञानेश्वर पिंपळे, आकाश चंदनशिव, सचिन चंदनशिव, पंडितराव खरात, विष्णू तायडे, शंकर खंदारे, अनिल पिंपळे, उमेश पिंपळे, पुरुषोत्तम सोनवणे, गणेश चंदनशिव, राजेंद्र चंदनशिव, संतोष चंदनशिव, अमोल अवसरमोल, विवेक पिंपळे.
🔹 सोयगाव: उपसरपंच रमेश दादा तायडे, कौतिक महाले, पवन बुधवत, विशाल तायडे, गणेश कचाटे, नितीन बुधवत, विष्णू बुधवत, ज्ञानदेव बुधवार, दीपक बुधवत, कारभारी वासे, गणेश शेगर, सदानंद राठोड, आनंदा राठोड, दिलीप बुधवत, विष्णू तायडे.
🔹 शेलुद: राहुल जगदाळे, नामदेव नवले, देवा नवले, हर्षल मोकळे, विजय कदम, विजय केसरकर, दत्ता जगताप, सचिन कदम, गौरव गाडेकर, करण नवले, महादेव नवले, सागर लहाने, निलेश जांभळे.
🔹 ढालसावंगी (धाड): तौफिक काझी, फिरोज काजी, बाबा काजी, अरबाज काजी, रईस काजी, रफिक काझी, निसार काजी, ऐसान काजी, समीर काजी, रिजवान काजी, अबुल काजी, वसीम काजी, वाजिद काजी, शहबाज काजी, शफिक काजी.
🔹 दहिद खुर्द: मधुकर दांडगे, गणेश धायडे, ज्ञानेश्वर कानडजे, पुंजाजी पारवे, रामदास काळवाघे, अर्जुन चव्हाण, विजय दळवी, गजानन जवंजाळ, संतोष गाडेकर, भगवान मांडवे, जीवन दांडगे, रामदास फुकट, वैभव दांडगे, सुभाष गावंडे, पवन दांडगे, अमोल भारुडे, भास्कर बारोटे, सुनील सपकाळ, सुनील सरोदे, नितीन सुरगडे, विठ्ठल पवार.
🔹 केळवद: उबाठा शाखाप्रमुख विनोद ठेंग, प्रभाकर मोहिते, तेजराव लहाने, हरिभाऊ जाधव, सिताराम बर्डे, गुलाबराव अवसरमोल, संतोष भोजने, गजानन बावणे, भागवत पाटील, सुनील नाटेकर, रमेश जाधव, अर्जुन लोखंडे, तुकाराम जाधव, निलेश यंगड, अशोक भोसले, बाळू यंगड, अशोक गायकवाड, सुधाकर भारती, गजानन जाधव, भागवत गायकवाड, प्रकाश आप्पा, गजानन पाटील, कडूबा शिंदे.
🔹 देवपूर: शिवाजी जाधव (पैलवान), संजय कन्नर, सचिन नरोटे, विलास नरोटे, पांडुरंग कन्नर, चरणसिंग राजपूत, सतीश नरोटे, रामदास नरोटे, कृष्णा नरोटे, शिवानंद नप्ते, साहेबराव कन्नर, आनंदा कन्नर, योगेश नरोटे, अमोल नरोटे, समाधान नप्ते, रघुनाथ सरोदे, प्रकाश नरोटे, गोपाल जाधव, सचिन जाधव, अनिकेत राजपूत, वैभव नरोटे, किरण इंगळे, राहुल कन्नर, संजय कांबळे, गजानन नरोटे.
🔸 करणखेड:
अक्षय गायकवाड, संदीप सावळे, संतोष गायकवाड, एकनाथ गायकवाड, प्रवीण सपकाळ, विठ्ठल इंगळे, ओम गायकवाड, भरत गायकवाड, छगनराव गवळी, समाधान मोरे, राम गायकवाड, राम पाटील, मंगेश गायकवाड, अजबराव अंभोरे
🔸 भानखेड:
रोहित इंगळे, रितेश इंगळे, रोशन सुरडकर, राहुल देवकुळे, प्रवीण इंगळे, प्रेम इंगळे, रोशन इंगळे, ओम इंगळे, संकेत सोनुने, अनिकेत सोनुने, शेखर इंगळे, विकास इंगळे, सागर इंगळे, घनश्याम इंगळे, शुभम इंगळे, ओम सोनवणे, अभिजीत पाडळे, करण साळवे, यश इंगळे, निखिल सुरडकर, चेतन इंगळे, वैभव इंगळे
🔸 तेल्हारा:
भास्करराव कुटे, गौरव इंगळे, अनिकेत इंगळे, हर्षल धनवे, आयुष सपकाळ, आदित्य खिराडे, अनिल कुटे, रोषण ठोंबरे, रोहन कुटे, गणेश पानझडे, गणेश कुटे, रामपिंपळे, शिवराज कुटे, नागेश भाकरे, नारायण कुटे, ओम जाधव, बाळराजे कुटे, उमेश कुटे, स्वप्निल कुटे, अभिमन्यू कुटे, समाधान कुटे
🔸 पेठ:
दिनकरराव डुकरे, गजानन शेळके, पवन डुकरे, गोपाल शेळके, राहुल भोसले, चंद्रमोहन जाधव, रवींद्र मोरे, अभि शेळके, योगेश डुकरे, कृष्णा शेळके, प्रतीक शेळके, विलास घाडगे, देवानंद पवार, राम पवार, वैभव पवार, संतोष शेळके, मंगेश पांढरे, कुणाल शेळके, कृष्णा काकडे, शत्रुघ्न शेळके, सचिन लोखंडे
🔸 बोरगाव काकडे:
प्रशांत पाटील, राजू गाडे, रतिराम तायडे, जीवन काकडे, कृष्णा यंगड, सागर वांजोळ, दीपक मांजरे, अमोल सोरमारे, विजय काकडे, अमोल खानजोडे
🔸 आंधई:
सरपंच खुशाल चौरे, पोलीस पाटील रवींद्र साकोळ, संकेत रेंगे, आकाश आवडे
🔸 गोदरी:
विलास अण्णा भवर, विजय शेळके, विठ्ठल परीहार, किसन सुरडकर, गुलाबराव परीहार, रामेश्वर परिहार, रमेश लहाने, राजू काळे
🔸 डोंगरशेवली:
मनोज ठोंबरे, मंगेश तायडे, राहुल भुतेकर, प्रतीक सावळे, विकास जाधव आदी गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.



0 Comments