Politics News : उबाठा व राष्ट्रवादी (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांचा शिंदे शिवसेनेत मोठा प्रवेश

 चिखलीत शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरूच ; २० ते २५ गावांतील शेकडो कार्यकर्त्यांची ऐतिहासिक घरवापसी

“शिवसैनिक माझा परिवार” – आमदार संजय गायकवाड यांचा ठाम शब्दांत विश्वास




              

बुलढाणा /( गणेश भवर / द बातमीवाला )-  चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, आज दि. 29 मार्च रोजी पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना उबाठा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील तब्बल २० ते २५ गावांतील अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत भगव्या विचारांशी निष्ठा व्यक्त केली.हा पक्षप्रवेश सोहळा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमात युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामुळे विशेष ऊर्जा निर्माण झाली होती.यावेळी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी आपल्या भाषणात ठाम शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत कोणत्याही शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. शिवसैनिक माझा परिवार आहे आणि त्यांच्या सन्मानासाठी व सुरक्षेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे.” तसेच त्यांनी पुढे “विकास, विश्वास आणि ठाम नेतृत्व या बळावर शिवसेना जनतेच्या मनात घर करत आहे. तळागाळातील शेवटच्या कार्यकर्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असेही नमूद केले.

🔶 पक्षप्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते

या ऐतिहासिक सोहळ्यात उबाठा गटातील माजी तालुकाप्रमुख विश्वासराव खंडागळे, संतोषराव वाकडे, गणेश यंगड, गजानन भुसारी, सुधाकर भाऊ अंभोरे, गजानन सोळंके, संजय महाले, विठ्ठलराव येवले, नारायण जवंजाळ, बंटी देशमुख, सुधाकरभाऊ जंजाळ, देविदास मोरे, पंजाबराव जंजाळ, कृष्णा तेजनकर, मंगेश आकाळ, नंदकिशोर चिंचोले, सागर वाघ, राजू जवंजाळ, मदन भुसारी, संजाबराव पऱ्हाड, तेजराव पाटील (धुमाळवाडी), शरद मोरे, सागर जंजाळ, समाधान मोरे, मोहन कोकाटे, श्रीकिसन तेजनकर, संजय जंजाळ, बाबू चिंचोले, शामा मोरे, केशव मोरे, अक्षय मोरे, विनोद जंजाळ, राजू जंजाळ, किसान शेळके, विशाल मोरे, सचिन जंजाळ, मंगेश अंभोरे, तुषार अंभोरे, पंकज जंजाळ, युवराज जंजाळ, ओम जंजाळ, शामराव जावळे, रमेश कापसे, विलास मोरे, राजेंद्र जंजाळ, निलेश कोकाटे, नागेश अंभोरे, वासुदेव मोरे, नितीन मोरे आदींचा समावेश होता. तसेच हराळखेड येथील अरुण गायकवाड, गणेश येवले, ऋषिकेश बोरसे, अनिकेत गायकवाड, लखन जाधव, संतोष जाधव, अभिषेक जाधव; भोरसा-भोरसी येथील संजय भुसारी, पंजाबराव पऱ्हाड, अरुण भुसारी, सौरभ भुसारी, सागर आकाळ, मंगेश आकाळ, गजानन गवई, भिका गवई, प्रमोद भुसारी, ओम भुसारी, अनिल गवई, राहुल गवई, संजय खरे, राजू पवार, मधुकर गवळी, शेषराव भुसारी; अमडापूर-इसोली येथील विठ्ठल येवले, सिद्धार्थ येवले; बोरगाव काकडे येथील विष्णू काकडे, राजू वायाळ, दत्तू काकडे, अशोक दहीकर, गजानन पिठले, हर्षल काटकर, परमेश्वर सोरमारे, नितीन उबाळे; तोरणवाडा येथील नारायण जंजाळ; उदयनगर, धुमाळवाडी, पेन सावंगी, मंगळूर, एकलारा, तेल्हारा, कव्हळा, टाकरखेड हेलगा, नायगाव बुद्रुक, शेवाळेवाडी येथीलही अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. शेवाळेवाडी येथील सुरेश शेवाळे, राजूभाऊ शेवाळे, प्रदीप रिंढे, मोहन शेवाळे, जनार्दन पवार, रामेश्वर मापारी, विनोद शेवाळे, निलेश शेवाळे, शेषराव शेवाळे, मारुती शेवाळे, वसंतराव शेवाळे, संदीप शेवाळे, भगवान बिडवे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

🔷 मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास व्यासपीठावर मृत्युंजय संजय गायकवाड, पृथ्वीराज संजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, भास्करराव मोरे, संदीप गायकवाड, जिजाताई राठोड, अनुजाताई सावळे, धनंजय बारोटे, नितीन राजपूत, मनोज लाहुडकर, दीपक तुपकर, निलेश गुजर, मयुरीताई देशपांडे, मयूर पडोळ, अमोल शिंदे, सुनील सपकाळ, मोहन पऱ्हाड, सागर घट्टे, श्रीकृष्ण शिंदे, संतोष शिंगणे, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल रिंढे व प्रा. अमोल वानखेडे यांनी केले. या भव्य पक्षप्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा ठोस प्रभाव पडणार असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments