चिखलीचा रवी खांडवेचा आंध्र प्रदेशात अपघात !
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीने धाव
चिखली (द बातमीवाला)- चिखली शहरातील पुंडलिक नगर येथील रवी खांडवे यांचा आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे भीषण अपघात झाला. अपघातानंतर तातडीने त्यांना तिरुपती येथील श्री रमादेवी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, बुलढाणा,चिखली येथील शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करून त्यांचे प्राण वाचवले.
अपघातानंतर परिस्थिती गंभीर होती. शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शहरप्रमुख विलास घोलप, नरेश राजपूत यांनी तातडीने संपर्क साधून मदत केली. तसेच तिरुपतीत वास्तव्यास असलेले चिखलीतील रहिवासी व संत सावता माळी हॉटेलचे मालक भगवान अंभोरे आणि रामभाऊ जाधव हे घटनास्थळी धावून आले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून औषधोपचारापर्यंत सर्व सोय केली आणि आर्थिक तसेच वैयक्तिक मदत पुरवली. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोग्य मंत्रालयातील संपूर्ण टीम रुग्णालयात पाठवली. त्यांनी खांडवे यांना पुढील उपचारासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे आदेश दिले तसेच सर्व उपचार विनाशुल्क करण्याचे निर्देश दिले. सध्या रवी खांडवे यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चिखलीकरांकडून प्रार्थना व्यक्त होत आहे. या घटनेत स्थानिक पदाधिकाऱ्यांची तत्परता आणि केंद्रीय मंत्र्यांचा सक्रिय हस्तक्षेप यामुळे रुग्णाला योग्य वेळी मदत मिळाली, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments