आनंदाच्या या सोहळ्याला सर्व भारतीयांनी उपस्थित राहावे : आ. सौ. श्वेताताई महाले
चिखली/(छोटू कांबळे) : दहीहंडीचा सण संपूर्ण भारतात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असलेल्या दूध,दही,लोणी यांची लयलूट व ही लय लूट करताना नृत्यविष्काराने आपल्या मनातील संवेदनांना आनंदाच्या परम शिखरावर सहजरित्या घेऊन जाणे हे दहीहंडीचे मूळ वैशिष्ट्य राहिले आहे. अशा या दहीहंडीच्या आनंददायी सणाला सामुदायिक रूप आले की आनंद दसपट वाढतो. ही गोष्ट लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
या दहीहंडीला प्रमुख आकर्षण म्हणून प्रति ऐश्वर्या हिंदी सिनेमा तारका स्नेहा उलाल जिचे हिंदी सिनेमातील पदार्पण हेच प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्यासोबत 'लकी' या सिनेमाद्वारे झाले होते,त्याचप्रमाणे मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान जिने प्रेमाची गोष्ट, झेंडा या सिनेमामध्ये व होणार सुन मी या घरची.., विन दोघातली ही तुटे ना..अशा लोकप्रिय मालिकामध्ये काम केले आहे.,सोबतच प्रसिद्ध डी. जे. आरे जो नृत्य संगीताचा बेताज बादशहा माणला जातो तो आणि यशस्वी सूत्रसंचालक यशा पाळणकर हे येत असून या दहीहंडीच्या स्वागताध्यक्ष चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील राहणार आहेत.
सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मूळ संकल्पनेतून सुरू झालेल्या चिखलीतील या भव्य दहीहंडीचे आयोजन भाजपा युवा मोर्चा कडून केले जात असून या दहीहंडीच्या उद्घाटनासाठी केंद्राच्या युवक कल्याण व युवा क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे या येणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव असणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून प्रमुख उपस्थित म्हणून माजी मंत्री भारत बोंद्रे, आमदार चैनसुख संचेती आमदार संजय कुटे आमदार संजय गायकवाड व आमदार मनोज कायंदे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार दिलीप सानंदा, यांच्यासह सचिन देशमुख, ओम सिंग राजपूत, नाझेर काझी,विजय गवई व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी गावागावातील गोविंदा पथके व युवकांनी मोठ्या संख्येने या आनंददायी पर्वाला उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा व आ. श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.
0 Comments