"Bridge of Harmony" : "पक्षीय सीमा ओलांडून राहुल बोंद्रे यांचा रामदासभाऊ देव्हडे यांना वाढदिवस शुभेच्छांचा संदेश"

रामदासभाऊ देव्हडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय मैत्री व सामाजिक स्नेहाचे दर्शन

"चिखलीत पक्षीय सीमा मोडली ; देव्हडे यांच्यासाठी बोंद्रे यांची शुभेच्छा"



चिखली (छोटू कांबळे/ द बातमीवाला) : चिखली नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मा. रामदासभाऊ देव्हडे यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि. २७ सप्टेंबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, पत्रकार, शैक्षणिक सहकार क्षेत्र तसेच राजकीय-सामाजिक वर्तुळातील मित्रपरिवार यांनी त्यांना भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. देव्हडे यांच्या लोकप्रियतेचे आणि समाजातील जिव्हाळ्याचे हे उत्तम दर्शन घडले.



दरम्यान, काल व्यस्त कार्यक्रमामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देता न आल्याने माजी आमदार तथा काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आज दि. २८ सप्टेंबर रोजी खास रामदासभाऊ देव्हडे यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करीत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी देव्हडे यांना निरोगी व प्रदीर्घ आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. या भेटीमुळे राजकीय स्पर्धेपलीकडील मैत्रीपूर्ण नाते प्रकर्षाने अधोरेखित झाले असून चिखली परिसरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

Post a Comment

0 Comments