कपिल खेड़ेकर यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती
चिखली नगरपरिषद, जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती सर्कलमध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन पाहणार जबाबदारी.
चिखली (छोटू कांबळे/ द बातमीवाला): चिखली विधानसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून, यासाठी कपिल भास्कर खेड़ेकर यांची निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार संजय रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात त्यांच्या हस्ते करण्यात आली.
ही निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. कपिल खेड़ेकर यांना चिखली विधानसभेत येणाऱ्या चिखली नगरपरिषद, जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती सर्कल या क्षेत्रांतील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता समन्वय, नियोजन व देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र आमदार संजय रामभाऊ गायकवाड यांनी प्रदान केले असून, पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कपिल खेड़ेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या संघटनात्मक कामात सक्रिय असून, पक्षाशी निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी जवळीक या गुणांमुळे त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून मिळाली. या नियुक्तीमुळे चिखली तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला नवे बळ मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

0 Comments