Brutal murder : “मंत्री” नावाच्या काकाचा रक्तरंजित थरार! पुतण्याचा कुन्हाडीने निर्घृण खून !

हातणीत काकाने केला पुतण्याचा कऱ्हाडीने निर्घृण खून !

किरकोळ वादातून घरातच रक्तपात, हातनी गाव हादरलं




      चिखली | छोटू कांबळे  - द बातमीवाला

चिखली - नात्यांनाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील हातनी येथे घडली आहे. एकाच घरात राहणाऱ्या काका-पुतण्यात झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर थेट निर्घृण हत्येत झाले. काका विनोद रामचंद्र जाधव उर्फ ‘मंत्री’ याने आपल्या सख्ख्या पुतण्याचा कुन्हाडीने ठेचून खून केल्याने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.
मयत गोपाल अजबराव जाधव (वय 23, रा. हातनी) हा दि. 21 जानेवारी 2026 रोजी काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी असताना काका विनोद जाधव याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. क्षणातच वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात काकाने कुन्हाडीच्या मागील बोथट भागाने गोपालच्या डोक्यावर व छातीत जोरदार वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या गोपालचा जागीच मृत्यू झाला.
घरातच घडलेल्या या निर्मम हत्येने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ चिखली पोलिसांना कळवले. मात्र पोलिस येत असल्याची चाहूल लागताच आरोपी काका अंधाराचा फायदा घेत फरार झाला. तो जवळच्या मक्याच्या शेतात लपून बसल्याचे निष्पन्न झाले.
चिखली पोलिसांनी तात्काळ कसून शोधमोहीम राबवत अवघ्या दोन तासांत आरोपीला शेतातून ताब्यात घेतले. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
ही कारवाई चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, नितीनसिंग चव्हाण, बिट जमादार अनिल वाघ, डी.बी. पथकातील अमोल गवई, प्रशांत धंदर, राहुल पायघन, अजय इटावा, अमोल इंगळे, विजय किटे, विनोद ब्राम्हणे  यांनी यशस्वी केली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments