Suicide : चिखलीत २३ वर्षीय युवकाची आत्महत्या, परिसरात खळबळ

सैलानी नगरमधील दुर्दैवी घटना ; युवकाचा गळफास लावून मृत्यू



चिखली /( द बातमीवाला ) : चिखली सैलानी नगर येथे राहणाऱ्या 23 वर्षीय नवाब शाह हारून शाह या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चव्हाण पेट्रोल पंपाजवळ, बुलढाणा रोडवर आज दिनांक१७ मे रोजीच्या रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे उघड झाले आहे.

घटनेनंतर नवाब शाह याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे नेण्यात आले असून, तेथे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या घटनेने सैलानी नगर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली आहे. आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. सदर घटनेने स्थानिकांमध्ये दु:ख आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments