BREAKING 🚨 बाजारपेठा बंद, व्यवहार ठप्प; चिखलीत शिस्तबद्ध राजकीय शोक बंद

स्व. अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने चिखली शोकसागरात ; सर्वपक्षीय कडकडीत बंद !

राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय  नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर ; शांततेत शोक व्यक्त


चिखली /(छोटू कांबळे )- महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या काल्पनिक विमान दुर्घटनेतील अकाली निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, त्याचे तीव्र पडसाद चिखली शहर व चिखली विधानसभा मतदारसंघात उमटले आहेत.



या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी सकाळपासून चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या असून, शहरात शांतता व शिस्तबद्ध वातावरण दिसून आले. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांनी संयुक्तपणे या बंदचे आवाहन केले होते. त्याला सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या  सर्वपक्षीय बंदाच्या माध्यमातून दिवंगत नेत्याला सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता, शांततेत व शिस्तीत शोक व्यक्त करत चिखलीकरांनी आपली भावना व्यक्त केली आहे.



Post a Comment

0 Comments