🚨 Crime Alert : चिखली डी.बी. पथकाचा धडाका! मोटारसायकल चोरटा जेरबंद !

 चिखली डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई ; मोटारसायकल चोरटा जाळ्यात

HF डिलक्ससह आरोपी ताब्यात ; अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा







चिखली/(छोटू कांबळे ) : चिखली शहरात मोटारसायकल चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या काही दिवसांत शोधून काढत मुद्देमालासह जेरबंद केले. गुप्त माहितीच्या आधारे जालना जिल्ह्यात धाड टाकत हीरो HF डिलक्स दुचाकीसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी यांनी आपली हीरो कंपनीची HF डिलक्स (क्र. MH २८ AW २५२१) ही दुचाकी चिखली येथील विश्रामगृह परिसरात लावली होती. काही वेळाने परत येऊन पाहिले असता वाहन जागेवरून गायब असल्याचे आढळले. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने २७ जानेवारी २०२६ रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध अप क्र. ७६/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हा जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील भारज बु. येथे असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पथकाने तेथे धडक देत संत सावता माळी भवनाजवळ संशयित ठिकाणी पाहणी केली असता चोरीस गेलेली HF डिलक्स दुचाकी एका घरासमोर उभी आढळली. चौकशीत सदर वाहन कृष्णा पवार हा वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कृष्णा आत्माराम पवार (वय २४, रा. उमरखेडा ता. भोकरदन, सध्या रा. भारज बु. ता. जाफ्राबाद, जि. जालना) यास ताब्यात घेऊन वाहनाच्या चेसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणी केली असता ते चोरीस गेलेलेच वाहन असल्याचे स्पष्ट झाले. पुढील कसून चौकशीत आरोपीने दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेऊन चिखली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोहेकॉ कैलास चतरकर व पो.कॉ. ज्ञानेश्वर शिंदे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. चिखली पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही दिवसांत चोरीचा छडा लागला असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक कायम असल्याचा संदेश पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या नेतृत्वात पोउपनि शरद भागवतकर, डी.बी. पथकाचे सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश सावळे, विशाल वायाळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले, तसेच पोहेकॉ कैलास चतरकर व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments