शिवसेनेत अनमोल ढोरे पाटील यांना मोठी जबाबदारी ; चिखली युवासेना विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती
चिखली |(द बातमीवाला )- शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांचा वारसा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अनमोल ढोरे पाटील यांची युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख, चिखली या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा जपत पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. पक्षासाठी सातत्याने केलेले कार्य, संघटनात्मक कौशल्य आणि शिवसेनेप्रती असलेली निष्ठा याची दखल घेत अनमोल ढोरे पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी प्रतापराव जाधव यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला अधिक बळकट करण्यासाठी पक्ष संघटना वाढविण्याचे आवाहन केले. अनमोल ढोरे पाटील यांच्या नियुक्तीमुळे चिखली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना युवासेना संघटनेला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

0 Comments