केस गळतीमुळे पाणीप्रदूषण: बाधित गावांतील पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग्य - प्रशासनाचे आवाहन

केस गळती प्रकरण ; बाधीत गावांतील पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग्य 

   🌀 पाणी न वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन 

 ◾ अफवावर विश्वास ठेवू नका- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील



 बुलडाणा, (जिमाका/) : बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसापासून केस गळतीच्या समस्या नागरिकांमध्ये आढळून आल्या.  यासंदर्भात आरोग्य विभागाने तपासणी केले असता या गावातील बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यानुसार प्रशासनाने केस गळती होणाऱ्या गावांतील पाणी पिण्यास किंवा उपयोगात आणु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

शेगांव तालुक्यातील कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, बुई, माटरगाव, पहुजीरा व निंदी या गावांमध्ये केस गळत असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाचे पथक पाठवून सर्वेक्षण करुन बांधीताची तपासणी व चाचण्या करुन  कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच काही नागरिकांचे स्कीन बायपसी टेस्टींग (Skin Biopsy Testing) व पाण्यामधील हेवीमेटल्स आरसेनिक व लीड याची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्वचारोग तज्‍ज्ञ यांनी रुग्णांची पाहणी करून प्राथमिक निदान फंगल इन्फेक्शन असु शकते व त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लक्षणे पाहुन उपचार सुरु केले आहे. जवळपासच्या तक्रार आलेल्या गावात आरोग्य पथक घरोघरी जावुन सर्वे करित आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष पथक तसेच राज्यस्तरावरुन सुद्धा वैद्यकीय पथक बाधीत गावात भेट देणार आहे.  बाधीत गावात झालेले केस गळती ही कोणत्याही व्हायरसमुळे झाले नसल्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये किंवा अफवावर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

बाधीत गावांमधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वारी हनुमान येथील धरणातून होत असून येथील पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त आहे. तथापी, बहुतांशी गावामध्ये वापरण्याच्या पाण्याचा स्त्रोत बोअरवेल किंवा विहिर असून हे पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या पाण्यामध्ये नायट्रेट व टिडिएस प्रमाणाबाहेर असल्याचे दिसून येते. त्वचारोग तज्ञांनी सुचविल्यानुसार पाण्यामध्ये आरसेनिक व लीड या हेविमेटल्सची तपासणी करणे गरजेचे असल्याने बाधीत गावांतील पाण्याचे नमुने नागपुर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्वचेचे व पाण्याचे नमुने अहवाल प्राप्त होण्यास पुढील आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे बाधीत गावातील नागरिकांनी अयोग्य असलेले पाणी पिण्यास किंवा ईतर उपयोगास आणु नये, असे अवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments