BREAKING : शिंदे यांची शिवसेना आक्रमक !

वाल्मिक कराडला फाशी देण्याची चिखली शिवसेनेची मागणी ; कराड "वाल्याचा" पुतळा जाळून केले निषेध आंदोलन !

चिखलीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक




चिखली (छोटू कांबळे): बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात पुन्हा संताप उसळला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी चिखली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली. चिखली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज, दिनांक ५ मार्च रोजी, वाल्मिक कराडच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारून व पुतळा जाळून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. 



या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना चिखली शहरप्रमुख विलास घोलप यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, माजी उपतालुकाप्रमुख कपिल खेडेकर, युवासेना तालुका प्रमुख गोपी लहाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी वाल्मिक कराडला फाशी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करत निषेध नोंदवला. या आंदोलनामध्ये रवी भगत, रामकृष्ण अंभोरे, विकी नकवाल, राहुल शेलकर, राका मेहेत्रे, पवन चिंचोले, गोपाल ठेंग, गजानन शेळके, अमर सुसर, दीपक रगड, शिवाजी शिराळे, बंडू नेमाने, अमर काळे, नारायण गरड, गणेश वाघमारे यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करत, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे. 

"निर्दयी गुन्हेगाराला फाशी हवीच" - ओमसिंग राजपूत

शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा क्रूर हत्येचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयाने यासंदर्भात कडक निर्णय घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा."

Post a Comment

0 Comments