डॉ. निलेश गावंडे यांची संशोधन क्षेत्रात नवी झेप, मान्यता समितीत विषय तज्ञ म्हणून निवड
शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण ; सर्वत्र स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव
चिखली /( छोटू कांबळे ) - चिखली येथील स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांची विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद बारहाते यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या 'ग्रंथालय व माहितीशास्त्र' विषयाच्या संशोधन व मान्यता समितीवर पुढील पाच वर्षांकरिता विषय तज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष असलेले प्राचार्य डॉ. निलेश गावंडे हे सध्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून यापूर्वी त्यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून शैक्षणिक संस्था प्राचार्य , प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव असल्यामुळे ते Naac च्या मूल्यांकन समितीचे तज्ञ् म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या प्रदिर्घ अनुभवाचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांनी साखरखर्डा येथे नेहरू युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या द्वारा स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय व गावंडे कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना केली. आज या महाविद्यालयात कला, वाणिज्य विज्ञान शाखेतून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच डी फार्म, बी. फार्म, एम, फार्म. व पी. जी. डी. एम. एल. टी. सारखे अभ्यासक्रम शिकवले जातात. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सहकार या क्षेत्रात सुद्धा प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांचा सक्रिय सहभाग असून या क्षेत्रात त्यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या या नियुक्तीमुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या 'ग्रंथालय व माहितीशास्त्र' विषयामध्ये संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ होणार आहे.
0 Comments