Chairperson Announced : चिखली नगरपरिषदेच्या समित्यांचे सभापती जाहीर !

चिखली नगरपरिषदेत समित्यांचा सत्तावाटपाचा सोहळा !

 बांधकाम, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा समित्यांची बिनविरोध निवड

उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया




चिखली/(छोटू कांबळे) :आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी चिखली नगरपरिषदेच्या विषय समित्या व स्थायी समितीच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. ही निवडणूक प्रक्रिया मा. पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बुलढाणा श्री. शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत व पारदर्शकपणे पार पडली.
सभेच्या प्रारंभी स्थायी समिती सदस्य संख्या १० व विषय समिती सदस्य संख्या ७ इतकी निश्चित करण्यात आली. तसेच नियोजन व विकास समितीसाठी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष राहतील, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यानंतर सभापती पदासाठी प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची सर्वांसमक्ष छाननी करण्यात आली. छाननीअंती प्राप्त झालेली सर्व नामनिर्देशन पत्रे वैध व पात्र असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी घोषित केले. नियमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली. या कालावधीत बांधकाम समिती, शिक्षण समिती, स्वच्छता व आरोग्य समिती तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीतील काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर पीठासीन अधिकारी श्री. शरद पाटील यांनी सर्व विषय समित्यांचे निकाल जाहीर केले. सर्व समित्यांचे सभापती बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी जाहीर केले.
विषय समित्यांचे सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे :
 बांधकाम समिती
सभापती : श्री. सुहास रामकृष्ण शेटे
सदस्य : मोहित धनंजय व्यवहारे, दीपक बुलचंद वाधवानी, दीपक विश्वनाथ खरात, मो. आसिफ मो. शरीफ, सौ. स्वाती अमोल लहाने, सौ. शीतल संतोष देशमुख
शिक्षण समिती
सभापती : शे. रफिक शे. कादर
सदस्य : सौ. प्रिया राम बनसोडे, सौ. अश्विनी विश्वनाथ जाधव, सौ. ज्योती भगवान वाळेकर, मो. इसरार अ. जब्बार, रत्नदीप यशवंत शिनगारे, सौ. सीमा गोपाल देव्हडे
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती
सभापती : श्री. विष्णू येडूजी जोगदंडे
सदस्य : दीपक बुलचंद वाधवानी, सौ. प्रिया राम बनसोडे, अमोल सुरेशअप्पा खबुतरे, सौ. सुप्रिया प्रशांत भटकर, डॉ. निलेश नारायणराव गावंडे, सौ. सरस्वती पुरुषोत्तम वायाळ
पाणी पुरवठा 
सभापती : श्री. गुरुदत्त विनायक सुसर
सदस्य : मोहित धनंजय व्यवहारे, सौ. अश्विनी विश्वनाथ जाधव, सौ. ज्योती भगवान वाळेकर, सौ. वहिदा बेगम मो. जकाउल्ला, सौ. मीनल निलेश गावंडे, मो. आसिफ मो. शरीफ
नियोजन व विकास समिती
सभापती : सौ. वैशाली कपिल खेडेकर
सदस्य : सागर दुर्गादास पुरोहित, सौ. प्रिया राम बनसोडे, सौ. अश्विनी विश्वनाथ जाधव
महिला व बालकल्याण समिती
सभापती : सौ. सुषमा विलास चव्हाण
उपसभापती : सौ. सुनिता प्रकाश शिंगणे
सदस्य : सौ. ज्योती भगवान वाळेकर, सौ. अश्विनी विश्वनाथ जाधव, सौ. सरस्वती पुरुषोत्तम वायाळ, सौ. संध्या आनंद बोंद्रे, सौ. प्रिया राम बनसोडे
स्थायी समिती पुढीलप्रमाणे :
पदसिद्ध अध्यक्ष : श्री. पंडितराव रामराव देशमुख
पदसिद्ध सदस्य : सुहास शेटे, शे. रफिक कादर, विष्णू जोगदंडे, गुरुदत्त सुसर, वैशाली खेडेकर, सुषमा चव्हाण
सदस्य : अमोल खबुतरे, दीपक खरात, खान उबेद अली शब्बीर अली
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मुख्याधिकारी श्री. प्रशांत बिडगर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना सहायक म्हणून काम पाहिले. सभेच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून पीठासीन अधिकारी श्री. शरद पाटील यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.





Post a Comment

0 Comments