Action Order : सारंगवाडी जलसंधारण प्रकल्पातील घोटाळ्याची एसआयटी चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

सारंगवाडी प्रकल्पातील अनियमिततेवर एसआयटी चौकशीचे मंत्र्यांचे आदेश !

माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या पाठपुराव्याला यश




चिखली/(द बातमीवाला) :    बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जलसंधारण प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्प प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि संगनमताचा अड्डा बनल्याचा धक्कादायक प्रकार  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणला होता. १६.६१ कोटीची मूळ निविदा २८०.६४ कोटी वरनेत यात १७०० % टक्यांची  वाढ झाली. प्रकल्पावर आतापर्यंत २३९ कोटी खर्च केले... पण प्रत्यक्षात काम कुठे ?  असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी उपस्थित करुन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून सारंगवाडी प्रकल्पातील अनियमिततेची आता एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे.  

 बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी जलसंधारण प्रकल्पाच्या खर्चवाढीबाबत आणि संभाव्य अनियमिततेबाबत विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून तीन महिन्यांत चौकशी केली जाईल तसेच दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी प्रकल्पाच्या किंमतीचा ‘अत्यंत संशयास्पद’ वाढता आलेख पत्रकार परिषदेत सादर केला होता. तसेच त्यांनी कामाची गुणवत्ता, गती आणि प्रत्यक्ष कार्यवाही मात्र शून्यावरच आहे. इतकी प्रचंड वाढ करूनही काम कुठे आहे ? असा सवाल उपस्थित केला होता. किन्ही नाईक गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ननकर यांनी ठेकेदार कंपनीकडून धमक्या येत असल्याचे पत्रकारपरिषदेत सांगून चौकशीची मागणी केली होती.

 

राहुल बोंद्रे यांनी दिले होते अधिकारी व ठेकेदारांना आव्हान

कंपनीला गौण खनिज रॉयल्टी संदर्भात 22,56,50,400/- (बावीस कोटी छप्पन लाख पन्नास हजार चारशे) रुपये दंडाचा आदेश पारित करण्यात आला. तहसीलदार मेहकर यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक 588/2018 दिनांक 30/10/2018 नुसार सदर आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांना सादर करण्यात आली आहे. जलसंधारण विभागाचे अधिकारी,  ठेकेदार यांनी 8, 17 व 20 किमी अंतरावरील ‘खुदाई स्थळ’ प्रत्यक्ष जनतेला दाखवून द्यावे. तसेच खाजगी जमिनीवरील खुदाईची रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावी, असे आव्हान जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिले होते.

Post a Comment

0 Comments