Political Breaking : काँग्रेसला धक्का, भाजपला बळ – राहुल सवडतकर आज भाजपमध्ये !

"हात सोडून कमळ धरणार" ! चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकरांचा काँग्रेसला रामराम

आमदार श्वेताताई महाले  यांच्या नेतृत्वात राहुल सवडतकरांचा असंख्य कार्यकर्त्यांसोबत आज भाजप प्रवेश




चिखली (छोटू कांबळे / द बातमीवाला ) – चिखली शहरातील राजकारणात मोठी घडामोड घडत असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. चिखली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल नंदकिशोर सवडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षाला कायमची सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते आज (दि. ६ मार्च) मुंबई येथील भाजप कार्यालयात भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.

हा पक्षप्रवेश चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती मिळत असून, काही क्षणातच हा राजकीय प्रवेश पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

  दरम्यान, चिखली नगर परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या काही निर्णयांमुळे राहुल सवडतकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या नाराजीमुळेच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांच्याकडे सुपूर्द केला होता. आता थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने चिखलीतील काँग्रेस संघटनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सवडतकर यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

राहुल सवडतकर हे शहर काँग्रेसचे सक्रिय आणि प्रभावी युवा नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडे युवक कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments