चिखलीत ग्रामीण पर्यटनाचा नवा अध्याय ; ‘देव्हडे फार्म अँड ऍग्रो टुरिझम’चे उद्या भव्य लोकार्पण
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सौ. ज्योतीताई बावनकुळे यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या अध्यक्षतेत तर मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांची राहणार विशेष उपस्थिती
राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार मंगलमय शुभारंभ
चिखली /(छोटु कांबळे )- बुलढाणा जिल्ह्याच्या तसेच चिखली शहराच्या वैभवात भर घालणारा, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा आणि निसर्ग, शेती व पर्यटनाचा संगम घडविणारा ‘देव्हडे फार्म अँड ऍग्रो टुरिझम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांतपणे निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी, आपल्या मातीतल्या संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी आणि ग्रामीण जीवनाचा जवळून अनुभव घेण्यासाठी चिखलीत पहिल्यांदाच हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
“भूमी हीच निष्ठा, कृषी हीच प्रतिष्ठा” या संकल्पनेवर आधारित ‘देव्हडे फार्म अँड ऍग्रो टुरिझम’चा भव्य शुभारंभ सोमवार, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता बुलढाणा रोड, चिखली येथे होणार आहे. या मंगलमय सोहळ्याला परमपूज्य आचार्य स्वामी हरि चैतन्य सरस्वती जी महाराज यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत.
या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ.ज्योतीताई चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील राहणार असून विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून ज्योतीताई बावनकुळे व चंद्रशेखर बावनकुळे यांचा लाडूतुला सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या भव्य कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, भाजपाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, नगर उपाध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर, माजी नगर उपाध्यक्ष राजाभाऊ खरात, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जंवजाळ, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला, ज्येष्ठ भाजपा नेते सुरेंद्रप्रसाद पांडे, ज्येष्ठ भाजपा नेते डॉ. प्रतापसिंह राजपूत, भाजपा चिखली शहराध्यक्ष सागर पुरोहित, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय चेके पाटील, भाजपा चिखली तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेश गावंडे, सिनाई ऍग्रो टुरिझमचे लहुजी अवताडे, मीरा सेलिब्रेशनचे संचालक शिवराज पाटील, शुभम मोटर्सचे संचालक संजय गाडेकर, बालाजी अर्बनचे अध्यक्ष मंगेश व्यवहारे, सह्याद्री कृषी पर्यटन वैरागडचे अमोल साठे आणि माजी नगरसेवक शेख अनिसभाई उपस्थित राहणार आहेत.
विशेष आमंत्रित अधिकारी म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, पर्यटन संचालनालय अमरावती प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, चिखलीचे तहसीलदार विजय सवडे, चिखलीचे गट विकास अधिकारी समाधान वाघ, चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर आणि चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
देव्हडे फार्म अँड ऍग्रो टुरिझममध्ये पर्यटकांसाठी बैलगाडी सैर, घोडा बग्गी सैर, ट्रॅक्टर ट्रेन, फोटोशूट लोकेशन, इनडोअर गेम्स हॉल, पेट एरिया, ओपन जिप सफारी, चुलीवरचे जेवण, रेन डान्स, फिश पॉंड, फोम डान्स, जोगेश्वरी तलाव, स्विमिंग पूल, बोटिंग, पक्ष्यांची वाडी, टायर क्लाइंबर, प्ले अँड फन, झिप लाईन, ट्री रोप कोर्स, हँगिंग ब्रिज, लॉन, पॉटरी, फाउंटन, डायनिंग एरिया आणि महाराष्ट्रीयन वाडा यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शेकडो सागवान वृक्षांनी नटलेला हा परिसर पर्यटकांना ग्रामीण आणि निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा अनुभव देणार आहे.
या प्रकल्पासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सौ.विमलताई रामदाभाऊ देव्हडे, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ भाजपा नेते रामदासभाऊ देव्हडे, सौ.अर्चनाताई श्याम देव्हडे, सौ.सारिकाताई शिवा देव्हडे, सौ.हर्षाताई गोविंद देव्हडे, रणजीत देव्हडे, राधिका देव्हडे, स्वीकार देव्हडे, अजित देव्हडे, अथांग देव्हडे आणि शंभूराज देव्हडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
ग्रामीण पर्यटन, कृषी संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ घडविणाऱ्या या भव्य प्रकल्पाच्या शुभारंभ सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देव्हडे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments