"Young Corporator" : जनतेची साथ, प्रभाग क्रमांक सात ! ; व्यंकटेश बोंद्रेची राजकारणात एंट्री !

चिखलीत बोंद्रे घराण्यातील नवीन युवा दमदार चेहरा राजकारणात !

 प्रभाग क्रमांक सातसाठी व्यंकटेश बोंद्रे मैदानात ; जनतेचा नवा उमेदवार चर्चेत




चिखली /(छोटू कांबळे) - आगामी चिखली नगर परिषद निवडणूक २०२५ साठी राजकीय वातावरण तापू लागले असून, प्रभाग क्रमांक सात मध्ये  युवा नवीन चेहरा म्हणून  माजी आमदार जनु भाऊ बोंद्रे यांच्या घरातील त्यांचे पुतणे श्री. व्यंकटेश सुनील बोंद्रे यांनी मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर “जनतेची साथ, प्रभाग क्रमांक सात!” या घोषवाक्यासह व्यंकटेश बोंद्रे यांच्या समर्थकांनी चालवलेली मोहिम सध्या जोरदार चर्चेत आहे. शहरात आणि व्यापारी वर्गात त्यांच्या उमेदवारीबाबत मोठ्या उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यंकटेश बोंद्रे हे सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. ते चिखलीतील प्रसिद्ध त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष असून, अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमांत अग्रेसर आहेत. त्यांचा तरुणाईत मोठा फ्रेंड सर्कल असून, व्यापारी वर्ग, सामाजिक मंडळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना मजबूत पाठिंबा मिळत आहे.
सध्या ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी “निवडणूक लढवणार आणि जिंकणार” असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
व्यंकटेश बोंद्रे हे काँग्रेसचे माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय वारसा आणि तरुणाईचा जोश यांचा संगम स्थानिक राजकारणात नवा अध्याय लिहू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
जनतेच्या अपेक्षा, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याचा निर्धार यामुळे प्रभाग क्रमांक सात मधील निवडणूक यंदा विशेष रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
जनतेच्या मनात प्रश्न एकच — प्रभाग क्रमांक सातमध्ये बदलाचा झंझावात आणणारा चेहरा व्यंकटेश बोंद्रे ठरणार का?पाठीवर कोणतंही पद नाही तरीही विश्वासाच्या आधारावर हजारो लोकसोबत आहेत..




Post a Comment

0 Comments