संतोष परिहार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्षपदी नियुक्त
चिखली/ (छोटू कांबळे): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या चिखली तालुक्यातील संघटनाला नवे नेतृत्व मिळाले असून संतोष दत्तात्रय परिहार यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन संतोष परिहार यांना पक्षाची जबाबदारी दिली आहे . या नियुक्तीचे श्रेय त्यांनी आमदार मनोजदादा कायंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, ज्येष्ठ नेते मनोज दांडगे तसेच सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या नियुक्तीबाबत परिहार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
परिहार यांच्या नियुक्तीमुळे चिखली तालुक्यात पक्ष संघटन अधिक भक्कम करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. पक्षाला तळागाळापर्यंत नेण्याबरोबरच पक्षाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे, कार्यकर्त्यांना जोडून पक्षशक्ती वाढविणे हे त्यांच्यासमोरचे आव्हान असेल. त्यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. या नव्या नियुक्तीमुळे चिखली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन आणखी बळकट होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments