चिखलीत खळबळ ! आतेभावाने केला विनयभंग ; आजी-आत्याने केली मारहाण
चिखली पोलिसांनी तत्काळ केला गुन्हा दाखल
चिखली/(छोटू कांबळे ) : चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत गांधीनगर भागात एका १३ वर्षीय पीडितेने धक्कादायक तक्रार दाखल केली आहे. पीडितेनुसार, ती लोणार येथे तिच्या वडिलांकडे इयत्ता सातवीत शिकते. तिथे तिची आत्या आणि आजी देखील राहतात. पीडितेचा आतेभाऊ, स्वराज ज्ञानेश्वर वाघ, तिला वाईट उद्देशाने स्पर्श करतो आणि याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देतो, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
पीडितेने ही बाब तिची आजी आणि आत्या यांना सांगितल्यावर त्यांनी तिला उलट लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ 'Fir on the spot' उपक्रमांतर्गत पीडितेच्या घरी जाऊन तिची तक्रार नोंदवली. पोलिसांनी स्वराज ज्ञानेश्वर वाघ याच्या विरोधात भा.द.वि. कलम 75(2), 78 (2), 115 (2) 351 (2)(3), 3,5 सह कलम 8 व 12 पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments