IMPACT : अखेर प्रशासन जागे झाले... द बातमीवाला वृत्ताची दखल !

सततच्या पावसामुळे गोदरी पाझर तलाव ओव्हरफुल ; तलाव भिंतीला गेले तडे, भेगा !

कर्तव्यदक्ष आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्तक्षेपाने तात्काळ पाहणी व उपाययोजना

"द बातमीवाला" वृत्ताची प्रशासनाने घेतली दखल ; आमदार श्वेताताई महाले पाटील यांची तातडीची हालचाल



चिखली ( गणेश भवर ) :- चिखली तालुक्यातील गोदरी मल्हारवाडी नजीक असलेला जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अंतर्गत जुना पाझर तलाव सततच्या मुसळधार पावसामुळे धोक्याच्या स्थितीत पोहोचला आहे. तलावाची भिंत तडे जाऊन भेगा पडल्यामुळे तलाव फुटण्याची भीती व्यक्त होत होती. तलाव ओव्हरफुल झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गंभीर परिस्थितीची दखल "द बातमीवाला" या वेब पोर्टल वृत्तवाहिनीने सर्वप्रथम घेतली आणि प्रशासनाला याकडे लक्ष वेधले. त्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करत संवेदनशीलतेने परिस्थितीवर लक्ष केंद्रीत केले.

आ. श्वेताताई महाले पाटील यांनी कार्यकारी अभियंता पिंपळे यांच्याशी थेट चर्चा करून तात्काळ तलावाची पाहणी करण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांनी पालकमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे जिल्हा नियोजन समिती निधीतून दुरुस्तीकरिता आर्थिक तरतूद व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच तलावातील सांडव्यातील पाणी सोडणे, भिंतीवरील झाडे-झुडपे त्वरित हटवणे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या. आमदारांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ग्रामस्थ व शेतकरी बांधवांना धीर देण्यात आला आणि प्रत्यक्ष कामकाज हाती घेण्यात आले. या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील, तालुकाध्यक्ष नीरज गायकवाड, स्वीय सहाय्यक सुरेश इंगळे पाटील, सरपंच अशोक सुरडकर, ग्रा. पं. सदस्य गणेश देशमुख, गजानन काळे, रमेश भवर, सिंचन विभागाचे अधिकारी खरपास साहेब, देठे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद भवर, गोपाल काळे, भीमराव काळे, दीपक महाले, काशिनाथ बकाल, कारभारी घोलप, माधव घोलप, दौलत शेळके, नारायण बकाल आदी मान्यवर उपस्थित होते. सततच्या पावसामुळे तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला असला तरी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे प्रशासन व संबंधित विभाग सतर्क झाले असून तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments