बुलढाणा जिल्ह्याच्या काकू श्रीमती प्रभावती शिंगणे यांचे वृद्धापकाळाने निधन
८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; उद्या बुलढाण्यात होणार अंत्यसंस्कार
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा होत्या श्रीमती शिंगणे
बुलढाणा /(द बातमीवाला ):– सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी व बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची मातोश्री श्रीमती प्रभावती भास्करराव शिंगणे (वय ८५) यांचे आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी सोमवार रोजी संध्याकाळी ४.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
श्रीमती प्रभावती भास्करराव शिंगणे यांचा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यावर ठसा उमटवणारा प्रभाव होता. त्यांच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र, डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशन व मोर्चासाठी नाशिक येथे असल्याने अंत्यसंस्काराची वेळ अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.
दैनिक "आम्ही चिखलीकर" व "द बातमीवाला" वेब पोर्टल वृत्तवाहिनी परिवाराच्या वतीने आम्ही स्वर्गीय श्रीमती प्रभावती शिंगणे काकू यांना विनम्र अभिवादन करीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.💐💐
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना. 🙏
0 Comments