विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ; छाननीअंती 187 नामनिर्देशनपत्र पात्र तर 12 अपात्र
बुलडाणा, (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सातही विधानसभा मतदारसंघामध्ये 199 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यांची छाननी आज करण्यात आली. त्यानुसार 187 अर्ज पात्र तर 12 नामनिर्देशने अपात्र ठरविण्यात आली आहेत.
सातही विधानसभा मतदारसंघात आज छाननी करण्यात आली. त्यामध्ये मलकापूर येथे 22, बुलढाणा येथे 21, चिखली येथे 42, सिंदखेड राजा येथे 35, मेहकर येथे 30, खामगांव येथे 22 व जळगांव जामोद येथे 15 असे एकूण 187 उमेदवारांचे नामनिर्देशन पात्र ठरले. तर मलकापूर व चिखली येथे प्रत्येक एक, सिंदखेड राजा येथे दोन, खामगांव व जळगाव जामोद येथे प्रत्येकी चार नामनिर्देशन अर्ज असे एकूण 12 अर्ज अपात्र ठरविण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघनिहाय अवैध अर्ज
21-मलकापूर मतदारसंघातील संगीता नौकरीया(अपक्ष), 23-चिखली मतदारसंघातील सुकेशनी शालीकराम गवई, 24-सिंदखेड राजा मतदारसंघातील प्रशांत दिलीप पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), सिद्धार्थ आबाराव सिनगारे (बहुजन समाज पार्टी), 26-खामगांव मतदारसंघातील गौरव तुलीसीराम सपकाळ(अपक्ष), अलका दिलीपकुमार सनंदा(भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी), ॲड. दशरत भिकाजी वानखडे(बहुजन समाज पार्टी) व मो. बिलाल सत्तार(इंडियन युनीयन मुसलीम लीग), 27-जळगाव जामोद मतदारसंघातील अपर्णा संजय कुटे(शिवसेना उद्धव ठाकरे गट), विनोद सुखदेव इंगळे(बहुजन समाज पार्टी), प्रफुल्ल अरुण तायडे(रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) व ज्ञानेश्वर समाधान मारोडे(अपक्ष).
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघनिहाय वैध अर्ज
21- मलकापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव : चैनसुख मदनलाल संचेती (भारतीय जनता पार्टी), धिरज धम्मपाल इंगळे (बहुजन समाज पार्टी), राजेश पंडीतराव एकडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), इंतेजार हुसेन सफदर हुसेन (मायनॅरिटिज डेमोक्रेटीक पार्टी), प्रविण लक्ष्मण पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष), बळीराम कृष्णा धाडे (जयहिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी), मोहम्मद जमीरुदिन मोहम्मद साबीरउदीन (वंचीत बहुजन आघाडी), शे. इमरान शे बिस्मील्ला (इंडीयन युनियन मुस्लीम लीग). अपक्ष उमेदवार : खान जफर अफसर खान, विजय प्रल्हाद गव्हाड, नसीर अ. रज्जाक, संदिप देविदास फाटे, भिवा सदाशिव चोपडे, मोहम्मद दानीश अब्दुल रशीद, योगेंद्र विठ्ठल कोलते, विरसिंह ईश्वरसिंह राजपुत, शेख अकील शेख मजिद, शेख आबीद शेख बशीर, सचिन दिलीप देशमुख, सुनिल वसंतराव विंचनकर, सौरभ चंद्रवदन इंगळे, हरीश महादेवसिंह रावळ.
22- बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव : जयश्री सुनिल शेळके (शिवसेना उध्दव बाळासोब ठाकरे), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), संजय रामभाऊ गायकवाड (शिवसेना), प्रशांत उत्तम वाघोदे (वंचित बहुजन आघाडी), प्रेमलता प्रकाश सोनोरे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), मोहम्मद गुफरान दिवान (स्वाभिमानी पक्ष), भाई विकास प्रकाश नांदवे (राष्ट्रीय समाज पक्ष), सतिश रमेश पवार (आझाद समाज पार्टी (कांशीराम)), सतीशचंद्र दिनकर रोठे पाटील (महाराष्ट्र विकास आघाडी), अपक्ष उमेदवार : अरुण संतोषराव सुसर, आरिफ खान विवन खान, जयश्री रविंद्र शेळके, जितेंद्र एन. जैन. निलेश अशोक हिवाळे, प्रमोद पुंजाजी कळसकर, डॉ. मोबीन खान अय्युब खान, मोहम्मद अन्सार मोहम्मद अल्ताफ, प्रा. रतन आत्माराम कदम, विजयराज हरिभाऊ शिंदे, प्रा. सदानंद मन्साराम माळी, स्वाती विष्णू कंकाळ.
23 -चिखली विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव : गणेश ऊर्फ बंडू श्रीराम बरबडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), राहुल सिध्दविनाय बोंद्रे (इंडियन नॅशनल काँग्रेस), ॲड. शंकर शेषराव चव्हाण (बहुजन समाज पार्टी), सौ. श्वेता विद्याधर महाले (भारतीय जनता पार्टी), खालीद अहमद खान तालीब खान (जनतादल सेक्युलर), मच्छिंद्र शेषराव मघाडे (सोशलीस्ट पार्टी इंडीया), सौ. रेणुका विनोद गवई (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी), विजकांत सांडु गवई (रिपब्लिकन सेना), सिध्दांत अशोकराव वानखेडे (आझाद समाज पार्टी (कांशी राम)), सिध्देश्वर भगवान परिहार (वंचित बहुजन आघाडी), अपक्ष उमेदवार : अब्दुल रियाज अब्दुल समद सौदागर, अब्दुल वाहीद शे. इस्माईल, अविनाश निंबाजी गवई, देवानंद पांडुरंग गवई, नरहरी ओंकार गवई, नाजेमा नाज इम्रान पठाण, नासीर इब्राहीम सैय्यद, नितिन रंगनाथ इंगळे-राजपूत, प्रशांत पुरुषोत्तम ढोरे, बबन डिगांबर राऊत, मनोज सारंगधर लाहुडकर, मिलींदकुमार सुधाकर मघाडे, डॉ. मोबीन खान अय्युब खान, मोहमद रईस उस्मान मोहम्मद इद्रीस, मृत्युंजय संयज गायकवाड, सौ. रजनी अशोक हिवाळे, रविंद्र नारायण डाळीमकर, राजेंद्र सुरेश पडघान, राहुल जगन्नाथ बोंद्रे, राहुल प्रल्हाद बोर्डे, विजय मारोती पवार, विनायक रामभाऊ सरनाईक (अंभोरे), सौ. वृषाली राहुल बोंद्रे, शरद डिगांबर चेके-पाटील, शरद रमेश खपके, शेख मुनव्वर शेख इब्राहीम, शें. सईद शे. मुस्ताक बागवान, सतीश जिवन पंडागळे, सतीश मारोती गवई, सिध्दार्थ अंकुश पैठणे, संजय धोंडु धुरंधर, संतोष रमेश उबाळे.
24- सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव : डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), प्रकाश भिवाजी गिते (बहुजन समाज पार्टी), डॉ शशिकांत नरसिंगराव खेडेकर (शिवसेना), मनोज देवानंद कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पाटी), सविता शिवाजी मुंढे (वंचीत बहुजन आघाडी), सुरेश एकनाथ गुमटकर (जनहित लोकशाही पार्टी), दत्तात्रय दगडू काकडे (स्वतंत्र भारत पक्ष), शिवानंद नारायण भानुसे (संभाजी ब्रिगेड पार्टी), अपक्ष उमेदवार : सय्यद मुबीन सय्यद नईम, रामदास मानसिंग काहाळे, विजय प्रतापराव घोंगे, अंकुर त्र्यंबक देशपांडे, नामदेव दगडू राठोड, गायत्री गणेश शिंगणे, अशोक श्रीराम पडघान, डॉ. मनोरखा रशीदखा पठाण, कुरेशी जुनैद रौफ शेख, अभय जगाराव चव्हाण, भाई दिलीप ब्रम्हाजी खरात, राजेंद्र मधुकर शिंगणे, सुनील पतींगराव जाधव, शेख रफिक शेख शफी, मनसब खान सादतमीर खान पठाण, दत्तू रामभाऊ चव्हाण, ज्ञानेश्वर कैलास म्हस्के, प्रल्हाद रंगनाथ सोरमारे, बाबासाहेब बन्सी म्हस्के, सुधाकर बबन काळे, भागवत देविदास राठोड, अल्का रामप्रसाद जायभाये, अ. असिफ अ. अजीज, शिवाजी बाबुराव मुंढे, विजय पंढरीनाथ गवई, सुनील तोताराम कायंदे, सुरज धर्मराव हनुमंते.
25- मेहकर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव : सिध्दार्थ रामभाऊ खरात (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), भैयासाहेब गोविंदराव पाटील (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), संजय भास्कर रायमुलकर (शिवसेना), संजय समाधान कळसकर (बहुजन समाज पार्टी), डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), दिपक केदार (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), नितीन बालमहेंद्र सदावर्ते (जयसेवालाल बहुजन विकास पार्टी), रजनिकांत सुधीर कांबळे (राष्ट्रीय समाज पक्ष), संघपाल कचरु पनाड (रिपब्लीक सेना), संदीप शामराव खिलारे (आझाद समाज पार्टी (कांशीराम)) अपक्ष उमेदवार : अशोक वामन हिवाळे, ॲङ ओम श्रीराम भालेराव, कैलास कचरु खंदारे, सिध्दार्थ प्रल्हाद खरात, डॉ. गोपालसिंह बछीरे, डॉ. जितेश वसंत साळवे, डॉ. जानु जगदेव मानकर, देविदास पिराजी सरकटे, नरहरी ओंकार गवई, प्रकाश गणपत अंभोरे, प्रकाश चिंधाजी गवई, पुनम विजय राठोड, भास्कर गोविंद इंगळे, महीपत पुंजाजी वाणी, मुरलीधर दगडू गवई, राजेश अशोकराव गवई, लक्ष्मणराव जानुजी घुमरे, वामनराव वानखेडे, डॉ. संतोष चंद्रभान तायडे, डॉ. सांची सिध्दार्थ खरात.
26- खामगांव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव : आकाश पांडुरंग फुडंकर(भारतीय जनता पार्टी), धिरज धम्मपाल इंगळे सौ आश्विनी विजय वाघमारे (बहुजन समाज पार्टी), राणा दिलीपकुमार गोकुळ सानंदा (इंडियन नॅशनल काँग्रेस),शिवशंकर पुरुषोत्तम लगर(महाराष्ट नवनिर्माण सेना), देवराव भाऊराव हिवराळे(वंचीत बहुजन आघाडी), पवन केशव जैन वशीमकर (समता पार्टी), भिमराव हरीषचंद्र गवई (रिपब्लीक सेना), मोहमद आरीफ अब्दुल लतीफ(ऑल इंडीया मजलीस इ-इनकलाब-इ-मिलात), मो.हसन इनामदार (मायनॅरिटिज डेमोक्रेटीक पार्टी), शे.रशीद शे कालु (इंडीयन नॅशनल मुस्लीम लीग) अपक्ष उमेदवार : अमोल अशोक अंधारे, उध्दव ओंकार आटोळे, किरण रामचंद्र मोरे, निखिल मोहनदास थडे, प्रकाश वासुदेव लोखंडे, मोहम्मद फारुख अब्दुल वाहब, रमेश केशवराव खिरडकर, ॲड. रविंद्र ज्ञानदेव भोजने, सिध्दोधन भारत साळवे, शेख फारुख शेख बिस्मील्ला, शाम बन्सीलाल शर्मा.
27 जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव : अमित रमेशराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माणना), संजय श्रीराम कुटे ( भारतीय जनता पाटी), अजय सुखदेव शेगोकार (बहुजन समाज पार्टी), डॉ. स्वाती संदिप वाकेकर (इंडीयन नॅशलन काँग्रेस), डॉ. प्रवीण जनार्दन पाटील (वंचित बहुजन आघाडी), प्रशांत काशीराम डिक्कर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी). अपक्ष उमेदवार : अजहरउल्ला खान अमान उल्ला खान, सफसर खान शब्बीर खान, अरुण भिकाजी निंबोळकर, देवानंद शंकर आमझरे, पवन भावराव गवई, प्रकाश विठृल भिसे, मंगेश विश्वनाथ मानकर, सुजीत श्रीकृष्ण बांगर, डॉ. संदिप रामदास वाकेकर.
सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
0000

0 Comments