Crime alert : चिखलीत गोवंशाचे कातडे जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 गोवंश संरक्षणासाठी चिखली पोलिसांची कडक पावले

(संग्रहित छायाचित्र)


चिखली/( द बातमीवाला )- चिखलीच्या बाबुलाज चौकात गोवंशाचे कातडे आढळल्याने स्थानिक पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. काल १८ जून रोजीच्या रात्री ११ वाजता चिखली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बाबूलाज चौकात एका बोलेरो पिकअप (वाहन क्रमांक MH 30 BD 0048) गाडीत गोवंशाचे कातडे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गाडीची तपासणी केली असता, गाडीत ३५ नग गोवंशाचे कातडे सापडले. या कातड्यांची किंमत ३,५०० रुपये असून, बोलेरो पिकअप गाडीची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी एकूण ३ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी शेख मोईन शेख रशीद (रा. बोराखेडी) याच्या विरोधात चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत कलम 6A, 5B, 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन नमुने ताब्यात घेतले आहेत. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत. गोवंश संरक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments