"15 दिवसांचा अल्टीमेटम – शिवसेनेची चेतावणी"

वचनाची पुर्तता करुन सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी समिती नेमूण मार्ग मोकळा करा

 चिखलीत उबाठा ठाकरे शिवसेना आक्रमक



चिखली /( छोटू कांबळे ) -  चिखली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे , युवा सेनेच्यावतीने शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख किसनराव धोंडगे, शहरप्रमुख श्रीराम झोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कर्‍हाडे यांच्या नेतृत्वात युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्या सहकार्याने चिखलीचे तहसिलदार यांना आज दि. 27 जानेवारी रोजी निवेदन देवून समस्यांचा पाढा वाचण्यात आला. 

दिलेल्या निवेदनात नमूद की , येत्या 15 दिवसांत प्रत्येक भागातील मुख्य अधिकारी यांना बोलावून प्रश्न सोडवावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने मोर्चा काढण्यात येईल. व त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. या मागण्यांमध्ये सिंचन विहीर घोटाळा चौकशी करुन पारदर्शकता आणून सबंधितावर कारवाई करावी, सोयाबीन, कापूस, तुरीला भाव मिळावा, कर्जमाफी करावी, कृषि विभागाचे अनुदान मिळावे, घरकुलाचे थकलेले हप्ते मिळावे, शासकीय नियमांने महाराष्ट्र बँक येथे शेतीविषयी कर्ज वाटप बंद आहे. चांधई येथे स्टेंट बँकेत अडकलेले खातेदारांचे पैसे मिळावे, शहराला पाणी पुरवठा करावा, स्वच्छता करावी, जुना मेहकर रोड, डी.पी.रोडवरील लोकांना पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, इलेक्टीकचे अवाढव्य बिले बंद करावी, मुक्या जनावरांची चोरी थांबवावी, शहरातील दिवसा होणार्‍या चोर्‍या थांबवाव्या, व कामगारांच्या नुतणीकरणाला स्वयं घोषणापत्र लागू करावे, भूमिअभिलेख कार्यालयातील मोजणी प्रकरणे निकाली काढावी, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करुन देण्यात यावे, पोषण मुबलक आहार मिळावा, महायुतीने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी नंदू कर्‍हाडे, किसनराव धोंडगे, श्रीरामभाऊ झोरे, प्रीतम गैची, आनंद गैची, कल्पनाताई कोर्‍हाळे, मनिषाताई माळोदे संतोष वाकडे, विष्णू मुरकुटे, वसंतराव झाल्टे, अशोक राजपूत, अरुण अंबसकर, विलास सुरडकर, कौतीकराव जाधव, नारायण वाणी, शाम शिंगणे, रवी पेटकर, शंभु गाडेकर, अनिल जावरे, बालूभाई, अरुण खडके, ऋषी शेळके, प्रवीण सरदड, मंगेश मोळवंडे, शुभम वानखेडे, राहुल वरवंडे, कृष्णा कदम, अक्षय माळोदे, राहूल मिसाळ, मदन आकाळ, विजय सोळंकी, छगन वानखेडे, बंडू जाधव,  हनुमान मुळे, शिवाजी पंडीत, गुलाबराव लोखंडे, राहूल मिसाळ, पांडूरंग पांडे, सुभाष साखरे, गोकुळ धनावत, भागवत पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, नागेश केवट, अजय पाटील, विजय सोळंकी, अनंता डोंगरदिवे, उत्तमराव भूतेकर, समाधान डुकरे, सुभाष सोनुने, गजानन कुटे, शेख सादीक, गजानन भूसारी, शेख समिर, देविदास सपकाळ, सुरेश सपकाळ, साईनाथ सुरडकर, ज्ञानेश्वर गायकवाड, वृषाली वानखेडे, अक्षय वानखेडे, गजानन फोलाने, चांगदेव पवार, रवींद्र सवडतकर, योगेश कर्‍हाडे, रामेश्वर भराड, गणेश वाघमारे, गजानन मोरे, संजय बरपूरे, विजय बावणे, प्रल्हाद पवार, हनुमान काळे, सुनिल साळवे, संजय यंगड, जगन साळवे, किसन सुरडकर, गणेश वाघमारे, कैलास निर्मळ, शंकर कोलते, ऋषीकेश डुकरे, सुनिल रगड, प्रभु कर्‍हाडे, रामेश्वर सुरडकर, एकनाथ जाधव, आनंथा सुरडकर, रामदास सुरडकर, शंकर गाडेकर, देविदास लोखंडे, मदन परिहार, दिपक जाधव, दिलीप गारडे, पुंजाजी शेळके, समाधान गायकवाड, आकाश गायकवाड, गोविंदा शेळके, तुषार हजारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments