चिखली शहर उद्या बंद : स्व. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आंदोलनाला सर्वपक्षीय मिळाला पाठिंबा !
शिंदे शिवसेनेचे चिखली शहरप्रमुख विलास घोलप यांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा
चिखली /( छोटू कांबळे ) : स्व. संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या तीव्र निषेधार्थ उद्या, मंगळवार, 11 मार्च 2025 रोजी चिखली शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंद आंदोलनाला सर्वपक्षीय, विविध संघटना आणि सर्वच स्तरांतून भरघोस पाठिंबा मिळत असून, शिंदे गट शिवसेनेचे चिखली शहर प्रमुख विलास घोलप यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
शिवसेना चिखली शहर प्रमुख विलास घोलप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना या आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. या बंदच्या माध्यमातून स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. शहरातील विविध व्यापारी संघटना,अडत - व्यापारी, बाजार समिती, सरपंच संघटना , विविध सामाजिक संघटनाही या बंदला पाठिंबा देत असून, जनतेत या हत्येच्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली असल्याचे समजते. स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण शहर शोकाकुल असून, या हत्येच्या निषेधार्थ होणाऱ्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments