चिखलीत युवकाची आत्महत्या : गळफास घेऊन आयुष्य संपवले
चिखली /( छोटू कांबळे ) : चिखलीतील संभाजीनगर वॉर्ड क्रमांक २३ मध्ये राहणाऱ्या भूषण प्रभुलाल पाराशर (वय २७) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज, १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
भूषणने किचनमध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिखली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. युवकाने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण समजण्यासाठी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
0 Comments