चिखलीकरांची एकजूट : स्व.संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी बंदचे आवाहन !

उद्या चिखलीत कडकडीत बंद , सर्वांनी निषेध नोंदवण्याचे आवाहन

दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी चिखली बंदला सर्वपक्षीय समर्थन



चिखली /( छोटू कांबळे ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ चिखली शहरात उद्या, मंगळवार, 11 मार्च 2025 रोजी कडकडीत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदला चिखली शहरातील व ग्रामीण भागातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक बाजार समिती, व्यापारी , अडत , सरपंच  आदी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी हा बंद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चिखली बसस्टँड परिसरातील कामाक्षी रेस्टॉरंटजवळ सकाळी 9:30 वाजता नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. सर्व व्यापारी, व्यावसायिक, व स्थानिक नागरिकांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या निषेधामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद फक्त एक निषेध नसून अन्यायाविरुद्धचा आवाज आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या बंदच्या माध्यमातून चिखलीतील नागरिक स्व. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. "आपली एकजूटच न्याय मिळवून देऊ शकते," असे सांगत शहरातील सर्व नागरिकांना व संघटनांना या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी उद्या शांततेत व एकजुटीने बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments