व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली त्रास देणाऱ्यांना चोप देऊ – कपिल खेडेकर यांचा इशारा !

'व्हॅलेंटाईन डे'च्या नावाखाली मुलींची छेडछाड रोखण्यासाठी कपिल खेडेकर यांचा इशारा ; 12 तरुणींच्या बेपत्ता होण्याने खळबळ



बुलढाणा /( छोटू कांबळे) : जिल्ह्यात व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर 12 तरुणी बेपत्ता झाल्याच्या गंभीर घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेचे नेते कपिल खेडेकर यांनी या संदर्भात कठोर इशारा दिला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली मुलींना त्रास देणाऱ्यांना थेट चोप देऊ, असे खेडेकर यांनी सणसणीत इशारा दिला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर राजकीय पक्षांच्या सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. कॅफे, गार्डन, मंदिर परिसर तसेच शाळा आणि कॉलेज परिसरात विशेष लक्ष दिले जाईल. मुलींच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचे उपक्रम फक्त व्हॅलेंटाईन डेपुरते न ठेवता रोज सुरू ठेवण्याचे आवाहन खेडेकर यांनी केले आहे.

गायब तरुणींच्या प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरू

जिल्ह्यात 12 तरुणी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाने नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

समाजातील नागरिकांना सतर्क राहून मुलींच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलींना त्रास देणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांपर्यंत किंवा पालकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील अशा घटना थांबवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

बेपत्ता तरुणींच्या कुटुंबियांसाठी हा काळ अत्यंत कठीण असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments