‘द बातमीवाला’ने गाठला दोन लाख वाचकांचा विक्रमी टप्पा – वाचकांचे आभार !
ताज्या आणि दर्जेदार बातम्यांनी ‘द बातमीवाला’ पोहोचले वाचकांच्या घराघरात !
डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत अवघ्या अल्प कालावधीत दोन लाखांहून अधिक वाचकांचा टप्पा गाठणाऱ्या ‘द बातमीवाला’ वेब पोर्टलने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ताज्या घडामोडी, अचूक बातम्या आणि सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून ‘द बातमीवाला’ने वाचकांची मनं जिंकत डिजिटल माध्यमांमध्ये विश्वसनीय नाव निर्माण केलं आहे.
वाचकांच्या विश्वासाने आणि प्रेमाने हा मोठा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. राजकीय घडामोडी, शेतकरी समस्या, गुन्हेगारी विश्व, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर समर्पक आणि माहितीपूर्ण बातम्या देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न ‘द बातमीवाला’ने केला आहे. गुणवत्तापूर्ण आणि वाचकांसाठी उपयुक्त बातम्या सादर करण्याची आमची वचनबद्धता यशाचे मुख्य कारण ठरली आहे.
दोन लाख वाचकांचा टप्पा ही केवळ संख्या नसून, वाचकांचा मिळालेला विश्वास आणि प्रेम याचे प्रतीक आहे. या यशासाठी आम्ही आमच्या वाचकांचे मनःपूर्वक आभार मानतो. पुढेही तुम्हाला ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देत राहण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल.
‘द बातमीवाला’ डिजिटल माध्यमाच्या क्रांतीमध्ये पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. आपल्या पाठिंब्यामुळे आम्ही नव्या उंचीवर पोहोचू, याची खात्री आहे. तुमचं प्रेम आणि विश्वास असाच कायम राहो, हीच अपेक्षा !
0 Comments