कुंभस्नानाची अनुभूती चिखलीतच; महाशिवरात्रीचे अमृत स्नान उपलब्ध !

महाशिवरात्रीसाठी प्रयागराजच्या अमृत जलाचे स्नान चिखलीत उपलब्ध

 दीपकभाऊ काळे मित्र मंडळाचा उपक्रम



चिखली/( छोटू कांबळे ) : चिखली विधानसभा मतदारसंघातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या भाविकांना प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेता आला नाही, त्यांच्यासाठी महाशिवरात्री निमित्त प्रयागराज येथील अमृत जलाचे आयोजन करण्यात आले आहे.                   

    हे विशेष आयोजन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले-पाटील आणि  श्री. विद्याधरजी महाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. दीपकभाऊ काळे मित्र मंडळाने हा उपक्रम पुढाकार घेत पूर्ण केला आहे. भाविकांना या अमृत जलाद्वारे महाशिवरात्रीचे स्नान करून पुण्यसंचय करण्याची संधी मिळणार आहे. 

अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी खालील व्यक्तींच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा :


 

  • शिवा इंगळे: 9763322101
  • प्रशांत देशमुख: +91 9960411765
  • शैलेश देशमुख: +91 8149355519

भाविकांनी या पवित्र उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments