श्वेताताईंच्या नेतृत्वाचा परिघ वाढतोय
दहीगाव येथील सरपंच उपसरपंचांसह मनसे, उबाठा व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
चिखली /( छोटू कांबळे) : विकासाच्या प्रक्रियेत कुठेही जात, धर्म, पक्ष यांचा भेद न करता सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची शैली असलेल्या आ. श्वेताताई महाले यांची लोकप्रियता व त्यांच्या नेतृत्वाचा परीघ दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून दि. १९ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर मौजे दहिगाव येथील मनसेच्या सरपंच मीरा विनोद खरपास, उपसरपंच कैलास नाबदे, कमलबाई खरपास, मनोरमा कदम, लताबाई गवई, रेणुका गाढवे, संतोष रसाळ, नारायण होगे, काँग्रेस नेते संतोष वांजोळ, विठोबा आरखेडे, परमानंद होगे, उबाठा गटाचे रंगामामा रसाळ, भागवत रसाळ, गणेश खंडागळे, दिनकर गाढवे, बाबू देवकर तसेच एकनाथ रसाळ, अशोक खरपास, सुधाकर रसाळ, शुभम होगे, मनोज होगे, विनायक होगे, बाबुराव चौधरी, मंगेश घडाळे, राजू ढोमणे, दत्ता देवकर, संदीप येवले, अनंता उंडे, सूर्यकांत गवई, गणेश गवई आदींचे पक्षात स्वागत करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजप नेते एकनाथ जाधव, दीपक गाढवे, बळीराम खरपास आदी उपस्थित होते.
आ. श्वेताताई महाले यांनी आज प्रवेश घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपा स्वागत केले. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य न्याय व योग्य प्रकारे संधी अवश्य मिळेल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करणे हेच आपले ध्येय असून यामध्ये प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन आमदार महाले यांनी आपल्या भाषणातून केले.
0 Comments