चिखली : गांधीनगर मुख्य रस्त्यावर गतिरोधक सात दिवसाच्या आत बसवा ; शिवसेनेची मागणी
मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर छोटेमोठे अपघातांचे प्रमाण वाढले असून, गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिखली नगरपालिका प्रशासनाने तत्काळ या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.शिवसेनेचे उपशहर प्रमुख रवी पेटकर, युवासेना शहराध्यक्ष आनंद गैची, युवासेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर, शिवसेना उपशहर प्रमुख राहुल वरवडे आणि इतर शिवसैनिक व नागरिकांनी चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना यांच्याकडे दि. 17 फेब्रुवारी रोजी निवेदन सादर केले. या निवेदनात सात दिवसांच्या आत रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या मागणीला स्थानिक नागरिकांचाही पाठिंबा असून, अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments