"चिखलीत २३ फेऱ्यांमध्ये ठरणार विजयी उमेदवार!"

"चिखली विधानसभेचा आमदार २३ नोव्हेंबरला , २३ फेऱ्या अंती ठरणार विजयी !"



चिखली/ ( द बातमीवाला ) :- चिखली विधानसभा मतदारसंघातील २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत ७२.०२ टक्के मतदान झाल्याने मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. २३ नोव्हेंबरला चिखली येथील क्रीडा संकुलात होणारी मतमोजणी २३ फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल. प्रत्येक फेरीत सर्व मतपत्रिकांचा तपास करून, विजयी उमेदवाराची अंतिम घोषणा केली जाईल.

निवडणुकीच्या निकालावर साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदानानंतर हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराच्या विजयाची आशा व्यक्त केली आहे. मतमोजणीचा परिणाम चिखली विधानसभा मतदारसंघातील पुढील राजकीय चित्र ठरवणारा ठरेल.


Post a Comment

0 Comments