वादळवारा- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या – आ. श्वेताताई महाले यांची अधिवेशनात आक्रमक मागणी
शेतकऱ्यांच्या व्यथेला आवाज ; आ. श्वेताताई महाले यांची भरपाईसाठी विधानसभेत ठाम भूमिका
चिखली/( छोटू कांबळे ) : दि. 25 व 26 जून रोजी तालुक्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टी व वादळी वारा यामुळे हंगामी फळभाज्या, कारली व दोडके यांच्या वेलाचे व अनुषंगाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहेकर सोबतच चिखली तालुक्यातील नुकसानग्रस्त आठ मंडळांनाही नुकसान भरपाई प्रदान करण्यात यावी अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताईताई महाले पाटील यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये केली.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बुलढाणा जिल्ह्यात 25 व 26 जून रोजी झालेल्या अतिवृष्टी या विषयावर माननीय सभापती महोदय यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना बोलण्यासाठी वेळ दिला होता. यावेळी चिखली तालुक्यातील आठ मंडळामध्ये फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांना आगामी नुकसान भरपाई पॅकेज मध्ये नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार पाटील आग्रही असल्याचे दिसून आले.
त्यांनी घेतलेले या आग्रही भूमिकेला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मकरंद आबा पाटील यांनी उत्तर देताना चिखली तालुक्यातील मंडळामध्ये जे नुकसान झाले असेल तिथे शासकीय नियमाप्रमाणे आवश्यक ती सर्व नुकसान भरपाई प्रदान करण्यात येईल असे आश्वासित केले.
24 25 व 26 जून या दिवशी वादळीवारा व अतिवृष्टी या नैसर्गिक आपदांनी हाता तोंडाशी आलेली कारली, दोडके व इतर नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर व सरसकट मिळावी यासाठी आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी वैरागड व हरणी येथील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यांची कारली दोडकी यांच्या वेलांची झालेली हानी त्याचप्रमाणे तालुक्यातील शेलगाव जहागीर व इतर गावातील अतिवृष्टी मध्ये तुटलेले बांध यांचाही उल्लेख आपल्या लक्षवेधीमध्ये केला.
0 Comments