पत्रकाराच्या घरात चोरट्यांची मेजवानी, दूध आणि मलईही गडप !

पत्रकाराच्या घरी घरफोडी : चोरट्यांनी मारला दूध-मलईवर ताव, लाखोंचा मुद्देमाल लंपास



बुलढाणा / ( द बातमीवाला ):-बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या पुढारी न्युज वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याची पोथ व रोख रक्कम असा १ लाख रुपयांचा ऐवज चोरला. काल दि.१५ जानेवारीला दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पुढारी न्यूज चॅनेलचे जिल्हा रिपोर्टर संदीप वानखडे हे शहरातील म्हाडा कॉलनीत राहतात. दि. १२ जानेवारीला ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. बुधवार, १५ जानेवारीला दुपारी बारा वाजता ते घरी परतले. यावेळी त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. घरात जाऊन बघितल्यानंतर बेडरूमच्या आलमारीमतील सामान अस्ताव्यस्त पडलेला होते.चोरट्यांनी ९ ग्रॅम सोन्याची पोथ व ३५ हजार रुपये रोख असा एक लाखाचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आले. चोरट्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेले दूध आणि मलाईचा अस्वाद घेतल्याचेही दिसून आले. संदीप वानखडे यांनी तातडीने बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ठसेतज्ज्ञही दाखल झाले. म्हाडा कॉलनी हा शहराचा विस्तारित भाग आहे. या परिसरात व्यसनी लोक गांजा, दारूची नशा करण्यासाठी येतात. या भागात पोलीस गस्त कधीच होत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.


फ्रीजमधील दूध व मलई गायब

चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करताना फ्रीजमधील दूध आणि मलईवर ताव मारल्याचेही निदर्शनास आले. या घटनेनंतर वानखडे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले.


म्हाडा कॉलनीत पोलीस गस्त नाही

म्हाडा कॉलनी हा शहराचा विस्तारित भाग आहे. या भागात व्यसनी लोक गांजा आणि दारूच्या नशेसाठी जमतात, त्यामुळे येथील सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये मोठी चिंता आहे. परिसरात पोलीस गस्त न झाल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेवरून बुलढाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.



Post a Comment

0 Comments