संजय गाडेकर यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का" !

 "संजय माणिकराव गाडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस पदाचा दिला राजीनामा "



बुलढाणा /( छोटू कांबळे ) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस संजय माणिकराव गाडेकर यांनी आज २१ जानेवारी २०२५ रोजी  आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका पत्राद्वारे त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांचा राजीनामा सादर केला. गाडेकर यांनी त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करत सांगितले की, "माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी पक्ष संघटनेला आवश्यक तो वेळ देणे शक्य होत नाही, त्यामुळे मी आजच्या दिनांकाने माझ्या पदाचा राजीनामा देत आहे."

संजय गाडेकर यांचा हा निर्णय पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. गाडेकर हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामात सक्रिय होते, आणि त्यांच्या कार्यामुळे पक्षाला अनेक ठिकाणी आधार मिळाला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पार्टीच्या कार्यप्रणालीवर काही परिणाम होईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment

0 Comments