Crime : वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत ओढली... तिन्ही आरोपी तुरुंगात

चिखली बस स्थानकावर सोन्याची पोत जबरीने चोरी करणाऱ्या तीन महिला आरोपींना चिखली पोलिसांनी केले गजाआड !



चिखली (छोटू कांबळे/द बातमीवाला)– चिखली बस स्थानकावर वृद्ध महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली असून, चोरी केलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे.

फिर्यादी कासुबाई पांडुरंग खरात (वय ६५) व त्यांची मुलगी ज्योती सरदार या सैलानी बाबाच्या दर्शनासाठी चिखली बस स्थानकावर आल्या होत्या. दुपारी सुमारे १.३० वाजता बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत तीन अनोळखी महिलांनी फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याची पोत (२ डोरले व २६ मण्यांची, अंदाजे ३ ग्रॅम किंमत २७,००० रुपये) जबरीने खेचून पळवली. फिर्यादींनी आरडाओरड केल्यानंतर ड्युटीवरील पोलीस पोलीस हवालदार सावळे यांनी त्वरित धाव घेत आरोपी महिलांना थांबवले. विचारपूस केल्यानंतर त्या महिला

 पुढीलप्रमाणे ओळखल्या गेल्या :

१) संगीता विलास पवार (वय ३५, रा. विरेगाव, जालना)

२) निशा राहुल धोत्रे (वय २४, रा. रेवकी, ता. गेवराई)

३) शेषुबाई पांडुरंग पवार (वय ४४, रा. मंगरूळ, ता. घनसावंगी, जि. जालना)

चिखली पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून, गुन्हा क्र. ६५५/२०२५ अंतर्गत भा. दं. सं. कलम ३०९ (४), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी निशा धोत्रे हिच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास व अटक कारवाईत डी.बी. पथक प्रमुख पोउपनि समाधान वडणे, सफौ राजेंद्र काळे (बॅज नं. ९०२), पोहेकॉ विजय किटे (बॅज नं. २०७२), पोना अमोल गवई (बॅज नं. २२६१), पोकॉ प्रशांत धंदर (बॅज नं. ५८१), पोकॉ अजय इटावा (बॅज नं. ४५४), पोकॉ पंढरीनाथ मिसाळ (बॅज नं. १२१६), पोहेकॉ निलेश सावळे (बॅज नं. १३४७), पोहेकॉ राहुल पायघन (बॅज नं. २५७०) आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले (बॅज नं. २४१८) यांचा समावेश होता.



Post a Comment

0 Comments