इच्छुक उमेदवार डॉ. संध्याताई कोठारी नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर ?
चिखली/(छोटू कांबळे) : चिखलीच्या राजकारणात आता नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदासाठीच्या चर्चांमध्ये इच्छुक उमेदवार डॉ. संध्याताई कोठारी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. काल, १ नोव्हेंबर रोजी चिखली येथे झालेल्या भव्य दीपावली स्नेहमिलन सोहळ्याने या चर्चांना आणखी धार आली आहे.
श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि भाजप, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सोहळ्याला आमदार सौ. श्वेताताई महाले-पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले साहेब, तसेच ज्येष्ठ नेते रामकृष्णदादा शेटे, सतीशशेठ गुप्ता, सुरेशअप्पा कबुतरे, रामदासभाऊ देव्हडे , डॉ. प्रताप सिंह राजपूत, सुरेंद्र पांडे, पंडितराव देशमुख, अशोक अग्रवाल, यांच्या सह अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात यांनी भूषवले. शहरातील व्यापारी, बागवान, डॉक्टर, वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांची व नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने कार्यक्रमाला मेळावा स्वरूप प्राप्त झाले. मंचावर भाजपचे सर्व अग्रगण्य नेते आणि नगराध्यक्षपदाचे अनेक इच्छुक उमेदवार एकत्र दिसल्याने राजकीय रंग चढला. मात्र, शिस्तबद्ध संघटनात्मक कार्य, समाजसेवेतील सक्रीय सहभाग आणि महिलांमधील लोकप्रियता या गुणांमुळे डॉ. संध्याताई कोठारी यांच्या नावाभोवती विशेष चर्चा रंगताना दिसली. भाजपच्या कोर कमिटीच्या चर्चांमध्येही कोठारी यांचे नाव जोरात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात त्यांच्या नावावर सकारात्मक चर्चा सुरू असून, "नगराध्यक्षपदासाठी महिला नेतृत्व पुढे आणण्याच्या" पक्षाच्या धोरणाशीही ते नाव सुसंगत ठरू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. दीपावली स्नेहमिलनाने केवळ प्रकाशाचा उत्सव साजरा केला नाही, तर चिखलीच्या राजकारणात नव्या युगाचा “राजकीय दीप” ही प्रज्वलित केला आहे. आगामी काही दिवसांत भाजपकडून होणाऱ्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार श्वेताताईंचा "बिगुल" संदेश
सभेत बोलताना आ. श्वेताताई महाले-पाटील म्हणाल्या, आगामी चिखली नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने “चिखली नगरपालिका 2025 साठीचा भाजपचा बिगुल आजपासून वाजला आहे. पक्षाच्या तत्त्वांवर, सेवाभावी कार्यावर आणि संघटनशक्तीवरच आमचा विजय निश्चित आहे.” भाजपकडून जे नगराध्यक्ष साठी व नगरसेवक उमेदवार राहतील त्यांच्या पाठीशी चिखलीकरांनी उभे राहावे त्यांनाच निवडून द्या.



0 Comments