रक्तदान हेच श्रेष्ठ दान ; संत निरंकारी मंडळाचे चिखली शाखेचे भव्य शिबिर रविवारी
रक्तदान जनजागृती रॅलीसह चिखलीत निरंकारी मंडळाचे भव्य आयोजन
चिखली /( विनोद चव्हाण/ द बातमीवाला ) :- संत निरंकारी मंडळ दिल्ली ब्रँच चिखली च्या वतीने दिनांक 12 /10/2025 वार रविवारला भव्य दिव्य रक्तदान शिबीर संत निरंकारी सत्संग भवन खामगाव रोड शेलूद चिखली येथे सकाळी वेळ 9.00 ते 3.00 वाजे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराला उदघाटक म्हणून चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे ,अध्यक्ष चिखली ठाणेदार संग्राम पाटील तर प्रमुख उपस्थिती चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समाधान वाघ, सहा. गटविकास अधिकारी गजानन पोफळे ,चिखली दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहा. सरकारी अभियोक्ता प्रभाकर मंगळकर ,चिखली उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमर सय्यद व डॉ. गवई तसेच त्यांची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे.रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी 7. 00 ते 9.00 या वेळेत रक्तदान जनजागृती रॅली ने संत निरंकारी सत्सग भवन येथून होईल व संपूर्ण चिखली शहरात ही रॅली रक्तदान जण जागृती करणार आहे.ह्या रॅली चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गणवेशधारी सेवादल भक्त व बालसंत विविध प्रकारचे रक्तदानाचे फलक असते. व रक्तदानाचे उदघाटन सकाळी ठिक 9.00 वाजता होणार आहे तरी या भव्य रक्तदान शिबिराचा लाभ मोठया संख्येने नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा संयोजक शालिकराम चवरे गुरुजी व संत निरंकारी मंडळ ब्रँच चिखलीच्या वतीने करण्यात येत आहे.

0 Comments