शिवसेना नेते कपिल खेडेकरांचा पुरग्रस्त भागात दौरा ; शेतकऱ्यांना दिला दिलासा
या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसारखी हंगामी पिके पाण्याखाली गेली आहेत. शिवाय गावकऱ्यांच्या घरांमध्ये तब्बल ५ ते ७ फूट पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य, धान्य आणि जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) नेते कपिल खेडेकर यांनी आज दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणी दौऱ्यात कपिल खेडेकर यांच्यासोबत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments