Politics News : चिखली राजकारणात मोठा उलटफेर ; मुस्लिम समाजातील दिग्गज नेते आता भाजपसोबत !

चिखलीत काँग्रेसला जबर धक्का ; काँग्रेस नेते तथा मुस्लिम समाजातील मोठ्या परिवारातील दिग्गज शहजाद अली खानांचा भाजपमध्ये शक्तीशाली प्रवेश ! 



चिखली/(छोटू कांबळे/द बातमीवाला) : चिखलीच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना — काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुस्लिम समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व तथा मोठ्या परिवारातील सदस्य श्री. शहजाद अली खान यांनी काँग्रेस पक्षाचा साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासदृष्टिकोनावर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून, दिनांक 5 ऑक्टोबर रोजी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितीत शहजाद अली खान यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण स्वागत करताना सांगितले की, “शहजाद अली खान यांचा पक्षप्रवेश हा केवळ एक व्यक्तीचा नाही, तर समाजाचा विश्वास भाजपवर वाढत असल्याचा पुरावा आहे.” कार्यक्रमाला श्री. सागर पुरोहित (शहराध्यक्ष, भाजप), श्री. संजय गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुका अध्यक्ष), श्री. अंकुशराव पाटील, श्री. शेख अनीश भाई, श्री. शैलेश बाहेती, हाजी हनीफभाई, नईम सौदागर, सलीम परवेज, राम बनसोडे, शैलेश देशमुख, नज्जू भाई, प्रशांत बापू देशमुख, शैलेश सोनुने आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे, शहजाद अली खान यांच्यासोबत मुस्लिम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून वातावरण भारावून टाकले. घोषणांनी परिसर दणाणून गेला.या पक्षप्रवेशामुळे चिखली तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, भाजपला मुस्लिम समाजात मोठा आधार मिळणार असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. “हा पक्षप्रवेश भाजपसाठी गेम चेंजर ठरेल,” असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.









Post a Comment

0 Comments