चिखलीत ट्रकच्या धडकेने स्कुटीस्वाराचा जागीच मृत्यू

चिखली-जालना महामार्गावर रेणुका पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात



चिखली / ( छोटू कांबळे ) : चिखली शहरालगत खामगाव-जालना महामार्गावर रेणुका पेट्रोल पंपाजवळ आज दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७:५० वाजता झालेल्या अपघातात स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

चिखली तालुक्यातील शिंदी हराळी येथील रहिवासी अविनाश ज्ञानदेव सपकाळ (वय ३६) हे मेहकर फाट्याकडून चिखली शहराच्या दिशेने प्रवास करत होते. याच दरम्यान, चिखलीकडून जळगावकडे जाणारा भरधाव वेगातील ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. ट्रकने रेणुका पेट्रोल पंपासमोर जोरदार धडक दिल्याने सपकाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments