खडकपुर्णा कालवा भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश !

भ्रष्टाचार चौकशीसह शेतकऱ्यांना नूकसान भरपाई देण्याची विनायक सरनाईक यांनी केली होती मागणी



चिखली /( द बातमीवाला ) - खडकपुर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक १ ते ४ कालव्यावरील शेतकऱ्यांच्या समस्या,कालव्यातून होणारी पाणी गळती व त्यामुळे होणारे पिकांचे नूकसान, कालव्याच्या साफसफाई कामातील भ्रष्टाचार याबाबत जिल्ह्यात अनेक वृत्त पत्रामधे बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीच्या आधारे व शेतकऱ्यांच्या तक्रारीवरूण क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध मुद्यान्वये चौकशी करण्याची मागणी केली होती.दरम्यान मुख्यमंत्री यांनी नुकसानीचे पंचनामे करणेसह भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

खडकपूर्णा प्रकल्पाच्या अचंरवाडी ते भरोसा दरम्यान असलेल्या टप्पा क्रमांक ३ च्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. यामुळे दरवर्षी पाणी पाझरून शेजारील शेतात तुबंते. याचा फटका या परीसरातील पाटाला जमीन लागून असलेल्या बादीत शेतकऱ्यांना बसत असून हरभरा,तुर आदि पीके सडून जात आहेत. या पाटातून पाझरलेल्या पाण्यामुळे सद्यस्थितीत सुमारे ३०० ते ३१५ एकरावरील तूर व हरभरासह इतर रब्बी पीके बाधीत झाली आहेत. कालव्याच्या या अवस्थेचा कालव्याला लागून शेती असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसत आहे.या शेतकऱ्यांना नुकसानीची तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते. या पाटाच्या दुरूस्तीच्या नावावर माेठा खर्च केला गेला यामधे भ्रष्टाचार झाला असून यामुळेच पाटा शेजारील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान होत आहे. रब्बीसाठी कालव्याव्दारे पाणी साेडण्यापूर्वीच कालव्यातील झाडे-झुडपे साफ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून झाली हाेती. यापृष्ठभूमीवर कालवा सफाईचे काम करण्यासाठी कंत्राट निघाले आहे. मात्र थातूरमातूर काम दाखवून बीले काढले गेला यासह विविध तक्रारी शेतकऱ्यांनी विनायक सरनाईक यांच्याकडे केली होती.या झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी,शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीपीकाचे पंचनामे होवून नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात यावी,शेतकऱ्यांच्या झालेल्या नूकसानीस सबंधीत यंत्रणा जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनायक सरनाईक यांनी केली होती.या मागणीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून जलसंपदा विभाग अधिक्षक अभियंता यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments