काँग्रेसच्या माथेफिरू कार्यकर्त्याने केली श्वेताताईंनी बांधलेल्या बस थांब्याची मोडतोड
(कठड्यांवर दगडाचे वार करतांना काँग्रेसचा माथेफिरू)
चिखली / ( छोटू कांबळे ) : विकासाच्या बाबतीमध्ये शहर व ग्रामीण असा भेदभाव न करता सर्वत्र विकासकार्याची गंगा पोहचवणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांच्या झंजावाती विकासकामांमुळे विरोधकांचा पोटशोट उठला आहे. सलग दुसऱ्या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील सोनेवाडी येथे आ. श्वेताताई महाले यांनी बांधून दिलेल्या बस थांब्याची काँग्रेसच्या एका माथेफिरू कार्यकर्त्यांने मोडतोड केली. दि. २९ जानेवारी रोजी झालेल्या या घटनेबद्दल गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोनेवाडी येथील बस थाब्याच्या दर्शनी भागात स्टीलचे कठडे बसवण्यात आले आहेत. सदर इसमाने या कठड्यांवर एकसारखे दगडाचे वार करून हे कठडे मोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यावेळी बस थांब्यामध्ये कोणीही प्रवासी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा इसम काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून विलास राखोंडे असे त्याचे नाव आहे. या व्यक्तीने केलेल्या या माथेफिरूपणाच्या कृत्यामुळे सोनेवाडी गावात गावातील रहिवाशांमध्ये व बस प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सरकारी मालमत्तेची अशाप्रकारे नासधूस करणाऱ्या विलास राखोंडे याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
0 Comments