कधी ऐकलंय असं ? आईच्या पोटातलं बाळही घेऊन आलं आश्चर्य !

आईच्या पोटात बाळ, आणि "त्या" बाळाच्या पोटातही बाळ !



 बुलढाणा / ( छोटू कांबळे ):- बुलढाणा जिल्ह्यात एक अजब केस समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरही अचंबित झाले आहेत. आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आलं आहे. आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आलं आहे.अशा केस दुर्मिळ असतात असंही डॉक्टर सांगतात. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. या बाळाची देखील वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असं म्हटलं जातं. अर्भकांमध्ये अर्भक असणं अशी ही घटना आहे. अशा केसमंध्ये एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असतं. साधारण पणे 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली आहे. 

डॉ. भुसारी यांनी सांगितले की, अशा केस या दुर्मिळ असतात. साधारणता पाच लाखात एखादी केस आढळते. याला फीटस इन फीटू असं म्हटलं जातं. मात्र अशा बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. हे तितकेच धोक्याचेही असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या आधीही अशा केसेस समोर आल्याचे भुसारी यांनी सांगितले. दरम्यान अशी केस समोर आल्यानंतर त्याची चर्चा संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे. 



Post a Comment

0 Comments