बीडमध्ये DPI चे आक्रमक आंदोलन, पोलिसांनी अजिंक्य भैय्या चांदणे यांना घेतले ताब्यात

सामाजिक न्याय निधी वळवण्याच्या निषेधार्थ आंदोलन ;  DPI अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांना अटक





बीड /(द बातमीवाला ) – महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाचा सुमारे ७००० कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवल्याच्या आरोपावरून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (DPI) आक्रमक झाली आहे. या निषेधार्थ DPI चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजिंक्यभैय्या चांदणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, अटकेनंतरही अजिंक्य भैय्या चांदणे यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. "मला अटक झाली तरी आंदोलन यशस्वी करा," असा ठाम संदेश त्यांनी दिला.

(चांदणे यांच्या अटके नंतरही आंदोलन सुरू)






या घटनेनंतर महाराष्ट्रभर DPI कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली असून, अनेक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे. "सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है" अशा घोषणा देत आंदोलनाला बळ दिले जात आहे. बीडमध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन सुरू केले असून, परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

DPI च्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, सामाजिक न्याय निधीची योग्य ठिकाणी पूर्तता झाली पाहिजे, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. पुढील काही दिवसांत सरकारच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.

Post a Comment

0 Comments